शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकुलतेच्या काळोखातून उजळलेल्या कासोद्याच्या ‘दीपक’ला विशेष सेवा पोलीस पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:09 IST

तीन जहाल नक्षलवाद्यांना केले अटक

कासोदा, एरंडोल- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पोलीस उप निरिक्षकपदी झेप घेतलेले येथील रहिवासी दीपक वारे यांना नक्षली भागातील कठीण व खडतर परिस्थितीत उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी २७ मार्च रोजी विशेष सेवा पदक, रोख एक हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.२७ मार्च रोजी राज्याचे पोलीस महासंचालक सु. कु.जयस्वाल यांनी नक्षली भागात विशेष सेवा बजावणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक व रोख रक्कम बक्षीस जाहीर करण्यात आले. त्यात दीपक वारे यांचे नाव आहे. दीपक वारे यांनी कर्तव्यावर असताना गॅरापत्ती ठाण्याच्या वडगाव हद्दीतील तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली होती. तसेच पुराळा हद्दीतील एका नक्षलवादी कुटुंबाचे मन परिवर्तन करून आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडले होते. मालेवाडा, मरमा, हेटाळकसा रस्त्यावरील भूसुरुंग नष्ट करून जिवित हानीही त्यांनी टाळली होती. कर्तव्यावर असताना त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. अतिसंवेदनशील भागात वर्षभरापेक्षा जास्त काळ राहून कोणतीही जीवित व वित्त हानी होऊ दिली नाही, आदिवासींचे जनजागरण तसेच साड्या कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून संबंध प्रस्थापित करण्यासह अनेकदा नक्षलवाद्यांशी प्रत्यक्ष चकमकी झाल्या, त्यात एकाला गंभीर दुखापत झाल्याची नोंद आहे. अशा उत्कृष्ट कामाची दखल घेत हे बक्षीस वारे यांना मिळाल्याने गावकऱ्यांकडून वारे यांचे कौतूक होत आहे. सुमारे साडेतीन वर्षे नक्षली भागात कर्तव्य बजावत असताना जिल्हा पोलीस प्रमुखांचेदेखील वीसच्यावर बक्षीसे दीपक वारे यांनी मिळविली आहेत. वारे हे हल्ली धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव