शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

शिक्षक मतदार संघच्या मतदानासाठी शिक्षकांना मिळणार विशेष नैमत्तिक रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 11:54 IST

विभागीय आयुक्त राजाराम माने यांची माहिती

ठळक मुद्देजळगावात घेतला आढावाफिरत्या पथकांसमवेत राहणार व्हिडिओग्राफर

जळगाव : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरीता मतदाराकडे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तेरापैकी कोणतेही एक छायाचित्र असलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार मतदानासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदार ओळखपत्र तपासण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी दिले. या सोबतच सर्व शिक्षक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना विशेष नैमत्तिक रजा मंजूर करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार (निवडणूक) सुरेश थोरात यांच्यासह जिल्ह्यातील मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त माने म्हणाले की, या निवडणुकीच्या मतदानासाठी वेळ वाढविण्यात आली असून आता मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. मतदानासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत शिक्षण विभागाने तसे परिपत्रक काढून सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे, सूक्ष्म निरीक्षक, भरारी पथकांबरोबरच पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडतील याबाबत दक्ष राहण्याचे निर्देशही माने यांनी दिले. यावेळी त्यांनी निवडणूक प्रशिक्षण, मतपेटी, मतपत्रिका, मतदानासाठी उपलब्ध करून दिलेले कर्मचारी, त्यांचे प्रशिक्षण, वाहनव्यवस्थेसह इतर बाबींचाही सविस्तर आढावा घेतला.फिरत्या पथकांसमवेत राहणार व्हिडिओग्राफरसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हास्तरावर आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुकास्तरावर फिरती भरारी पथके गठित करण्यात आली असून या पथकांसमवेत व्हिडिओग्राफर राहणार आहे. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, सेक्टर आॅफिसर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.सर्वाधिक मतदार जळगाव तालुक्यात२५ रोजी होणाºया या निवडणुकीसाठी जिल्ह्यात जळगाव तालुक्यात चार, चाळीसगाव, भुसावळ व अमळनेर तालुक्यात प्रत्येकी दोन तर धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २१ मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १२०५६ मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या ९३६३ तर स्त्री मतदारांची संख्या २६९३ आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २३८० मतदार जळगाव तालुक्यात असून त्यानंतर भुसावळ तालुक्यात १३६४, अमळनेर तालुक्यात १०३३ तर चाळीसगाव तालुक्यात ९९२ मतदार असल्याचे उपजिल्हाधिकारी भामरे यांनी सांगितले.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव