शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान वाढविण्यासाठी तीन घटकांवर विशेष लक्ष - निवडणूक निरीक्षक डॉ़ पार्थसारथी मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:29 IST

जनजागृतीवर भर

जळगाव : लोकशाहीत निवडणूक हा एक उत्सव असतो व हा उत्सव लोकसहभागानेच अधिक फुलतो, त्यासाठी अधिकाधिक मतदान होणे आवश्यक आहे़ मतदानाचा टक्का वाढावा म्हणून नवमतदार, अशिक्षित मतदार व नोकर वर्ग या तिघांवर लक्ष केंद्रीत करुन जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जळगावात आलेले निवडणूक निरीक्षक डॉ़ पार्थसारथी मिश्रा यांनी दिली़मतदानाबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीबाबत डॉ़ मिश्रा यांनी मंगळवारी सायंकाळी ‘लोकमत’शी संवाद साधला़ त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी :प्रश्न: जागृती खूप होते मात्र मतदानाचा टक्का वाढत नाही, यासाठी काय विशेष उपाययोजना?डॉ़ मिश्रा: निवडणुका यशस्वी तर लोकशाही यशस्वी, जेव्हा मुक्तपणे, कुठल्याही दबावाला बळी न पडता अधिक मतदान होते तेव्हा निवडणुका यशस्वी होतात़एका उत्सवाप्रमाणे यात सहभाग वाढणे महत्त्वाचे आहे़ यासाठी नवमतदारांना प्रोत्साहीत करणे, त्यांना महत्त्व समजावणे, यासह ज्या मतदारांना आपल्या अधिकाराबाबत माहितीही नसते त्यांना प्रोत्साहित करणे व नोकरवर्ग जो आहे तो यापासून वंचित राहू नये याबाबत सतर्क राहणे, याबाबींवर अधिक भर दिला जात आहे. आपण स्वत: शहरातील सहा ते सात महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठात, गुरूद्वारा येथे जावून तरूणांना मतदानाचे महत्त्व सांगितले़ एका सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले़प्रश्न : काळजी म्हणून काय उपाययोजना असतातडॉ़ मिश्रा: आचारसंहितेसंदर्भात नियमावली ठरवून दिलेली असते़ निवडणुकीतील उमेदवार व पक्षांनी ती पाळणे बंधनकारक असते़ त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण यंत्रणा असतेच, याव्यतिरिक्त उमेदवारांना प्रत्येक बाबींचा खर्च ठरवून दिलेला असतो तो तेवढाच करायचा असतो़ तसेच एखादवेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास केंद्रीय पोलीस दल, राज्य पोलीस दल हे नेहमी सतर्क असते, विविध भागातून फलॅग मार्च काढून पोलीस सतर्क असल्याचा संदेश दिला जातो़या निवडणुकीत नवीन काय ?अनेक बाबींचे फॉरमॅट बदलले आहेत़ डिजिटलायझेशन वाढले आहे़ अ‍ॅप्स उपलब्ध करून देण्यात आले आहे़ आयटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत़ या व्यतिरिक्त निवडणुकीशी संबधित अधिकाऱ्यांना आता दररोज रिपोर्ट द्यावा लागतो, दर दोन तासांनी रिर्पोटींग करावे लागते़ निवडणुका पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उपायोजना केल्या जात आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव