शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोल... सदानंदाचा येळकोट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:32 IST

मार्गशीर्ष महिना भगवंतांची विभूती मानला जातो. ‘मासानां मार्गशीर्षोहं’ असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगूनच ठेवले आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी ...

मार्गशीर्ष महिना भगवंतांची विभूती मानला जातो. ‘मासानां मार्गशीर्षोहं’ असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगूनच ठेवले आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवस खंडोबाची नवरात्र असते. महाराष्ट्रात खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत असून जेजुरी, निमगाव, पाली, नळदुर्ग आदी ठिकाणी खंडोबाची प्रसिध्द तीर्थक्षेत्रे आहेत. खंडोबाच्या नवरात्रात पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात. हा सहावा दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा होय. याच दिवशी भगवान शंकराने मणि आणि मल्ल दैत्यांचा संहार केला. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे उन्मत्त झालेल्या दैत्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करून दैत्याशी सहा दिवस युध्द केले. शेवटी मणि दैत्य शरण आला व मल्ल ठार झाला. त्याच्याच प्रार्थनेनुसार मार्तंड भैरवाने आपल्या नावापुढे त्याचे नाव लावून मल्ल+अरि (शत्रू) मल्लारी-मल्हारी असे नाव धारण केले.चंपाषष्ठीला मल्हारी पूजनानंतर तालिका पूजन (तळीची पूजा) करतात. तळीतली भंडारा देवाला वाहतात व तळी उचलून खाली ठेवतात. बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसादाचा काही भाग श्वानांना दिला जातो. कारण कुत्र्याला खंडोबाचा अवतार मानतात. चंपाषष्ठी अशारितीने आपणास भूतदयेचा संदेश देते. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिते भगवंत’ हे भक्तीचे वर्म चंपाषष्ठी आपल्याला समजावते.मणि आणि मल्ल हे दैत्य प्रत्यक्षात होते किंवा नाही, हे सांगता येणार नाही, पण आजही हे पैसा आणि दमन शक्तीच्या रुपात ‘मनी आणि मसल’ या रुपात अस्तित्वात आहेत. पैसा हा मणीचा तर गुंडगिरी हा मल्लाचा अवतार आहे. या दैत्यांचा उच्छाद आज सर्वत्र पहायला मिळतो आहे. सन्मार्गाने जीवन जगणे, या दैत्यांनी मुश्किल केले आहे. त्यांचा नि:पात करण्यासाठी तुमच्या माझ्यातला मल्हारी मार्तंड प्रकट झाला पाहिजे, हाच खरा चंपाषष्ठीचा संदेश आहे. गरीबाच्या ताटात भाजी - भाकरीचा नैवेद्य दररोज पडावा, कुणी उपाशी झोपू नये, भुकेलेल्यास अन्न मिळावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, सर्वाभूती ईश्वर पहा. असे झाले तरच ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु’ ही वेदांची प्रार्थना सार्थ होईल. त्याचदिवशी खऱ्या अर्थाने चंपाषष्ठीचे फळ प्राप्त होईल. त्याासाठी आपण संकल्प करू या...- प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव