बिडगाव, ता. चोपडा : येथून जवळच असलेल्या पंचक येथील ग्रामसभेत आबा सोये यांची महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
पंचक, ता. चोपडा येथे नुकतीच सरपंच बिस्मिल्ला तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यात विविध विषयांवर चर्चा करून मंजुरीही देण्यात आली, तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीही स्थापन करण्यावर चर्चा करून समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आबा सोये यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच बिस्मिल्ला तडवी, उपसरपंच किशोर पाटील, ग्रामसेवक दीपक भामरे, पोलीसपाटील सतीश वाघ, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, नेताजी पाटील, पुष्पा पाटील, मीना पाटील, जोहरा तडवी तसेच माजी सरपंच कल्पना सोये, प्रशांत पाटील, माधवराव पाटील, देवीदास सर, रसूल नबाब तडवी, रहेमान तडवी आदींनी नूतन अध्यक्ष सोये यांचे अभिनंदन केले.
080921\08jal_4_08092021_12.jpg
आबा सोये