शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जैविक व रासायनिक बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

कजगाव, ता. भडगाव : कजगाव ग्रामपंचायत सभागृहात कोविड नियमांचे पालन करून झालेल्या कार्यशाळेत खरीप हंगामात जैविक व रासायनिक ...

कजगाव, ता. भडगाव : कजगाव ग्रामपंचायत सभागृहात कोविड नियमांचे पालन करून झालेल्या कार्यशाळेत खरीप हंगामात जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले.

या कार्यक्रमात घरचे बियाणे उगवण क्षमता व बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. रासायनिक खतांचा वापर कमी करून खर्चात बचत करणे, बीजप्रक्रियेसाठी पी. एस. बी., अझेटोबॅक्टर, रायझोबियम, रासायनिक औषधांच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. जमीन सुपीकता निर्देशांकाचे वाचन करण्यात येऊन फर्टिलायझर कॅल्क्युलेटर ॲपचा वापर शेतकऱ्यांनी करावा, कडधान्य व तृणधान्य पिकानंतर कापूस पिकाची लागवड तांत्रिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. कंपोस्ट खत, गांडूळ खत, सेंद्रिय खत, हिरवळीच्या खताचा वापर जास्तीत जास्त करून पिकांची फेरपालट, आंतरपीक, मिश्रपीक पद्धती, मूलस्थानी जलसंधारण, सफळा पिकांचा वापर, रुंद सरी वरंबा (बी.बी.एफ.) यंत्राने पेरणी व जैविक कीड व रोग व्यवस्थापन इत्यादीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

कृषीविषयक माहिती शेतकऱ्यांना सोशल मीडियाद्वारे पुरविण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य आनंदा महाजन, एन. एस. महाजन व शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी इनोरा बायो कंपनीचे नीलेश पाटील व कृषी सहायक अनिल तायडे यांचे सहकार्य लाभले.