नंदुरबार : भरधाव मोटारसायकलने समोरून येणा:या दुस:या मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना भांगडा, ता.नंदुरबारनजीक घडली. पोलीस सूत्रांनुसार खेरवा, ता.निझर येथील मनोज मेघा वळवी हा युवक आपल्या मोटरसायकलने (क्रमांक जीजे 26-एच 3789) भवालीकडून खांडबाराकडे जात असताना वसलाई ते भांगडा शिवारात समोरून आलेल्या दुस:या मोटारसायकलने (क्रमांक जीजे 19- एल 4724) जबर धडक दिली. त्यात मनोज मेघा वळवी याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर धडक देणारा मोटारसायकलस्वार दिनेश किसन वसावा, रा.सायला, ता.निझर हा जबर जखमी झाला. याबाबत मानसिंग सुरजी वसावे यांच्या फिर्यादीवरून दिनेश वसावा याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार अशोक नवल धनगर करीत आहेत.
मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार
By admin | Updated: October 11, 2015 23:53 IST