शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सामाजिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:21 IST

लॉकडाउनला महिना उलटला आहे. सामाजिक घडी विस्कटलेली दिसते.

ठळक मुद्देलॉकडाऊनला महिना झाल्यानंतरची स्थितीमाणसं माणसापासून दुरावली

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : लॉकडाउनला महिना उलटला आहे. करोनाची लागण एका मनुष्यापासून दुसऱ्याला होते. कोरोनामुळे माणसं माणसांपासून दुरावली आहेत. सामाजिक घडी विस्कटलेली दिसते.मीच माझा रक्षक म्हणून काळजी घेणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी अत्यावश्यक आहेत. किंबहुना स्वत:सह इतरांनाही सुरक्षितता पाळणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडणे हेच यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मूळ मंत्र आहे. अशात महिन्याभरापासून लॉकडाउनमध्ये असलेली माणसे एकमेकापासून केव्हा दुरावली हे एकमेकांना कळलेच नाही. याचाच परिणाम सामाजिक जडणघडणीवर होतोे. सोशल डिस्टन्सिंग पाळता पाळता सोशल मीडियावर हे अघोषित समाज माध्यम बनले आहे. चांगले, वाईटवर खरे, खोटे याची पारख करण्याची मानसिकता कमी झाली असून लॉकडाउनचा परिणाम समाज मनावर अधिक गडद होत आहे.लॉकडाउनला आज महिना पूर्ण झाला आहे. या काळात समाजातील अनेक बदलते स्थित्यंतरे अनुभवायला मिळत आहे. शतकानंतर आलेल्या महामारीचा अनुभव व त्याचे वर्णन आजची पिढी पुढील अनेक पिढ्यांना करेल. अगदी कारण अवस्थाच तशी झाली आहे. पहाटे काकडा आरतीपासून तर रात्री शतपावली करताना अथवा झोपण्यापूर्वी ही देवाचे दर्शन घेणारे भाविक आज आपल्या लाडक्या देवदर्शनापासून दूर झाली आहेत. सत्संग, वारी यात्रोत्सव बंद झाले आहे. मंदिरे दर्शनासाठी बंद झाली आहेत तर मशिदी नमाजासाठी बंद झाली आहे. असे कधी होईल हे स्वप्नातसुद्धा कोणी पाहिले नव्हते ते आज घडत आहे. लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या. काहींचे लग्न तर लागले पण लग्नात कुटुंब सामील होऊ शकले नाही. कामगार आपल्या घरापासून शेकडो मैल अंतरावरील महानगरात अडकले आहे आणि त्याचे कुटुंबीय चिंतेत आहे. सामाजिक उपक्रम, मेळावे सांस्कृतिक कार्यक्रम अशा समाज सुधारण्यावादी उपक्रम सिनेमा, कौटुंबिक सहल, बाहेरचे जेवण, चार चौघातील गप्पागोष्टी मनाला आनंद देणाºया मित्रांची संगत, ज्येष्ठ नागरिकांच्या गावाच्या पारावरील बैठका, जावळापासून तर मानाचे पंगती, कौटुंबीक कार्यक्रम, मॉर्निग वाक, व्यायाम या गोष्टी हरवल्या आहेत. लॉकडाउनमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि घरात करमत नाही. एकलकोंडा अवस्थेत माणसं आली आहेत. सामाजीक उपक्रमातून सलोखा धार्मिक उपक्रमातून मिळणारा अध्यात्मिक आनंद मिळेनासा झाला आहे. गरिबांचा रोजगार गेला आहे. दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे. हातावर पोट असलेल्या मजुरांचे जीवन जगणे कठीण होत आहे. अगदी सामाजिक घडी विस्कटली आहे. लॉकडाउन संपण्याची सर्वच प्रतीक्षा करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर