शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तर... यांची असणार शाळास्तरावरील ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:26 IST

जळगाव : जिल्ह्यातील शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत असतो. मात्र, ...

जळगाव : जिल्ह्यातील शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ शालेय समिती अध्यक्ष, सदस्य तसेच पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात यावा, अशा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. त्याबाबत आदेश काढण्यात आले आहे.दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळांकडून प्रभात फेरी काढण्यात येत असते़ त्यात विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तसेच ढोल पथकांचाही समावेश असतो़ नंतर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पटवून दिले जात असते. मात्र, यंदा कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले असल्यामुळे सध्या शाळा बंद आहेत़ त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यातच शनिवारी स्वातंत्र्य दिन असल्यामुळे शिक्षण विभागाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत़ त्यात ध्वजारोहण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना बोलविण्यात येवू नये, असे आदेशात म्हटले आहे़ तसेच शाळा स्तरावरील कार्यक्रमात सामाजिक अंतरचे पालक करण्यात यावे व मास्क लावणे बंधनकारक असणार आहे़ ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा शाळा स्तरावर सकाळी ८.३५ वाजेच्यापूर्वी आयोजित करण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे़ तर कुठल्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचेही प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव