शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथील स्मिता बच्छाव ‘खान्देश मराठा कन्या’ पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:31 IST

खान्देश मराठा पाटील मंडळातर्फे मुंबईत चाळीसगाव येथील युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांना ‘खान्देश मराठा कन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देमुंबई येथे वार्षिक स्नेहसंमेलन झाला गौरवनेत्रदान, अवयवदान, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान

चाळीसगाव, जि.जळगाव : खान्देश मराठा पाटील मंडळातर्फे मुंबईत चाळीसगाव येथील युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांना ‘खान्देश मराठा कन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खान्देश मराठा पाटील मंडळातर्फे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्यात सामाजिक, क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रात अभिनव कामगिरी करणाऱ्या समाजधुरीणांना खान्देश भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यात चाळीसगावच्या युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांना खान्देश मराठा कन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी खान्देश मराठा पाटील मंडळाचे संस्थापक डॉ.बाळासाहेब मोहने, अध्यक्ष देवीदास बोरसे, सचिव विश्वनाथ पाटील, खासदार कपिल पाटील, आमदार किसनराव कथोरे, आमदार सीमा हिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. चाळीसगासहून शरद पाटील, छाया पाटील, नंदू पवार, दीपक पवार, बापू पाटील व बच्छाव परिवार आदी उपस्थित होते.समाज घटकातील महिला सक्षम व सर्वगुणसंपन्न होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व जनसेवा करणाºया पोलीस दलाच्या कुटुंंबातील सदस्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उदात्त हेतू ठेवून स्मिता बच्छाव यांनी युगंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या कार्यात्मक बांधणी केली आहे. यात होममिनिस्टर व गरबा नृत्य स्पर्धा या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्य मर्यादित न ठेवता अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.शाडू मातीपासून गणपती मूर्तीची कार्यशाळा, हळदीकुंकू, सबलीकरण कार्यक्रम, नेत्रदान आणि अवयवदानासाठी जनजागृतीपर आवाहन, पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वितरण, आरोग्यदायी चला धावू या स्पर्धा, आत्महत्या रोखण्यासाठी समूपदेशन, मूकबधिर शाळेतील साजरा केलेल्या बालदिनासोबत कुमारिका पूजन, चिमणी वाचवा अभिनव संदेश, ग्रामीण भागातील मुलींसाठी सॅनीटरी नॅपकीनचे वितरण व जनजागृती, निसर्गसहल असे अनेकविध उपक्रमातून स्मिता बच्छाव यांनी आपल्या कार्याचा ठसा रोवला आहे.यापूर्वी देखील स्मिता बच्छाव यांच्या कार्याची दखल घेत स्त्री शक्तीपीठ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. यात जळगाव येथे सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांत हिरकणी पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव