भुसावळ : शहरातील जळगाव रोडवरील हुंडाई शोरुम आणि सिंधी कॉलनीतील मिठाईचे दुकान फोडून चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांची तपासाची चक्रे फिरवून खडका चौफुली भागातून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.बुधवारी रात्री हुंदाई शोरुमध्ये चोरट्यांनी काँप्युटरचे सीपीयु चोरी केले. तर जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी भागात मनोहरलाल संतुमल वत्यानी यांच्या साई स्वीट दुकानात ९ मार्चला ६ हजार रुपये रोख व साडेचार हजाराचे गोल्ड फ्लॅक कंपनीचे ५० सिगारेट पाकीट चोरले होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन खडका चौफुली भागात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या किसन पन्नालाल धोबी (वय २२, रा.महात्मा फुले नगर भुसावळ) योगेश दिनकर कोळी (वय १८, रा.भारत नगर, भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी मिठाईच्या दुकानासह हुंदाई शोरुममध्येही चोरी केल्याची कबुली दिली. यावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, शंकर पाटील, पोलीस नाइक रवींद्र बिºहाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. मिलिंद कंक हे तपास करीत आहे.
दुकान फोडीतील आरोपींच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 21:19 IST