पारोळा : हिवरखेडे बु. ता.पारोळा या वंचित आदिवासी क्षेत्रातील गरीब, गरजू विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणा, त्यासाठी आवश्यक मदतीचा हात गणवेश मिळाल्यावर आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलला, तो सर्वात मोठा आनंद जीवनात देऊन गेल्याच्या भावना पारोळा येथील सी.ए.मुकेश कनकलाल चोरडिया यांनी मौजे हिवरखेडे येथे व्यक्त केल्या.
हिवरखेडे येथे ६० आदिवासी विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात गणवेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकेश चोरडिया होते. यावेळी मोहिनी कनकलाल जैन, लीना जैन उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, गणवेश वाटप करण्यात आले. या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्यावर कमालीचा आनंद त्या निरागस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटला.
सुंदर असे गणवेश मिळाल्याने विद्यार्थी उत्साहित झाले होते. हे बघून मुकेश चोरडिया यांनाही आनंद व समाधान वाटले. यावेळी चोरडिया परिवाराच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
हिवरखेडे शाळेचे ईश्वर धोबी, प्रसाद महाजन, सिद्धराज साळुंखे यांचे सहकार्य लाभले.
छाया- हिवरखेडे बु. ता.पारोळा येथे आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करताना, मुकेश चोरडिया, मोहिनी चोरडिया, लीना जैन मनवंत साळुंखे, गुणवंत पाटील आदी.