शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विकासाची संथ गती नागरिकांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:04 IST

जळगाव : शहरात गेल्या काही वर्षांपासून विकासाचा रथ गाळात रुतला असून जे कामे सुरु आहे, त्या कामांचा वेग पाहिला ...

जळगाव : शहरात गेल्या काही वर्षांपासून विकासाचा रथ गाळात रुतला असून जे कामे सुरु आहे, त्या कामांचा वेग पाहिला तर तो वेगही जळगावकरांसाठी त्रासदायक ठरत आहे. लहान-लहान कामांसाठीही महापालिकेचे मक्तेदार आठ-आठ महिने लावत असून ती कामेदेखील अतिशय सुमार दर्जाचे होत असल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे. विकासाची ही संथ गती जळगावकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे नसून अडचण असून खोळंबा अशीच स्थिती शहरातील विकासकामांची झाली आहे.शहरात १ हजारहून अधिक कोटींची कामे आणल्याचा दावा आमदार सुरेश भोळे यांनी गेल्या वर्षभरापुर्वी केला होता. मात्र, यापैकी अनेक कामे अजूनही झालेली नाहीत. ५०० कोटींच्या अमृत योजनेचे काम ेअजूनही सुरुच आहेत. २५ कोटींचा शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम मध्ये-मध्ये ब्रेक घेवून मुदत संपण्याची चिंता न करता सुरु आहे. घनकचरा प्रकल्प असो वा इतर कामे सर्वच कामे वर्ष होवूनही अजूनही अपुर्णावस्थेतच आहेत. मोठ्या कामांप्रमाणेच लहान-लहान कामांनाही अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने जळगावकरांना हा विकासाचा वेग न परवडण्याजोगाच दिसून येत आहे.मनपा फंडातून कामे होत असल्याने मक्तेदारांची टाळाटाळअनेक कामे २५ कोटींच्या निधीतून करण्यात येणार होती. मात्र, ३१ मेपर्यंत हा निधी खर्च न झाल्याने १५ कोटींचा अखर्चित निधी शासनाने परत मागविला आहे. त्यामुळे जी कामे सुरु आहेत, ती कामे आता मनपा फंडातून करण्यात येणार आहे. मनपा फंडातून कामे होत असल्याने बिलांची रक्कम उशिरा मिळेल म्हणून मक्तेदार काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या उशिरा होणाऱ्या कामांचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. मनपातील लिफ्टचे कामदेखील रखडले असून, इच्छादेवी चौक ते डीमार्टपर्यंतच्या दुभाजकांचे काम देखील सात महिन्यांनंतर आता पूर्ण झाले आहे.पदाधिकारी, नगरसेवकांनीच कामे घेतल्याने बोलणार कोण ? ... शहरात सुरु असलेले अनेक कामे मनपातील पदाधिकारी व नगरसेवकांनीच घेतली आहेत. त्यामुळे मक्तेदारांकडून उशीराने होत असलेल्या कामांबाबत कोणत्याही पदाधिकाऱ्यांकडून मक्तेदाराला खडेबोल देखील सुनावले जात नाही. तसेच मनपाचे अधिकारी देखील याबाबत चुप्पी साधून आहेत.सुमार दर्जाचे कामे, पावसातच होतेय पितळ उघडेजे काही कामे आतापर्यंत झाली आहेत त्यापैकी अनेक कामांचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने महिनाभराच्या पावसातच या कामांचे पितळ उघडे पडले आहे. बळीराम पेठेत तीन महिन्यांपूर्वी तयार केलेली गटार गुरुवारी पावसात वाहून गेली. तसेच पावसाळ्याचा तोंडावर जून महिन्यात मनपाने मुख्य भागातील रस्त्यांच्या केलेल्या दुरुस्तीचेही या पावसात पितळ उघडे पडले. गेल्यावर्षांप्रमाणे यावर्षी देखील खड्डे व चिखल तुडवतच मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे.दुध फेडरेशन रस्त्यावरील दुभाजकांचे सहा महिनेहोवूनही सुरुच-काम - शिवाजीनगरकडून दूध फेडरेशकडे येणाºया रस्त्यालगत दुभाजक बांधणे-सुरुवात - फेब्रुवारी २०२०-कामाची लांबी - ८०० मीटर-सध्यस्थिती - सहा महिने होवूनही या रस्त्यालगत दुभाजकांचे काम अजूनही अपूर्णावस्थेतच पडून आहे. दुभाजकांच्या कामामुळे रस्ता मधोमध खोदण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याचा दोन्हीही बाजूला डांबर, खडीचा मलबा पडून आहे. त्यातच मलनिस्सारण योजनेमुळे रस्ता खोदण्यात आल्याने या रस्त्यालगत वाहने चालविणे कठीण झाले.३०० मीटरचा नाल्याचे काम एक वर्षांपासून सुरुच-काम - एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील नाला काही प्रमाणात सरकवून नाला अरुंद करणे-सुरुवात - आॅगस्ट २०१९-कामाची लांबी - ३०० मीटर-सध्यस्थिती - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन महापौर सीमा भोळे यांच्याहस्ते या कामाचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र, एक वर्षापासून या नाल्याचे केवळ १०० मीटरचे काम अद्याप झाले आहे. तसेच गेल्यावर्षी नव्याने तयार करण्यात आलेली संरक्षण भिंत पावसात वाहून गेली होती. नाल्याचे काम थांबल्याने अनेक याभागातील घरांमध्ये पावसाचे पाणी नेहमीच शिरते.शिवाजीनगर शौचालयांचे कामही होईना-काम - शिवाजीनगर भागातील हमाल वाड्यात २४ शौचालयांचे काम-सुरुवात - मार्च २०२०-शौचालयांची संख्या - २४-सध्यस्थिती - २० शौचालये उभारण्यात आले आहेत. मात्र, प्लास्टरचे काम अजूनही शिल्लक. काम अपुर्ण असल्याने नागरिकांना उघड्यावर शौच करावे लागत आहे. त्यामुळे मनपाच्या हगणदारी मुक्तीच्या मोहीमेला हरताळ फासला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव