शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची संथ ‘गती’ व्यापार, उद्योगाच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:49 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगाव -औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जळगावच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसत असून या रस्त्याच्या संथ ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जळगावच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसत असून या रस्त्याच्या संथ गतीचामुळे सर्व हैराण झाले आहेत. त्यामुळे हा रस्त्याच्या गती येणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेचा फटका वाहनधारकांसह उद्योग क्षेत्रांना बसू लागला असून जळगावातील दालमिलमधून मराठवाड्यात दररोज जाणाऱ्या २०० टन डाळचीही वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून थांबली आहे. सोबतच लातूरसह वेगवेगळ््या भागातून येणारा कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी या रस्त्याचे काम जवळपास दीड वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. त्यात जामनेर तालुक्यातील नेरीपासून या कामाला सुरुवात होऊन हळूहळू थेट औरंगाबादपर्यंत संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवण्यात आला. रस्ता तर खोदला गेला मात्र काँक्रीटीकरण, डांबरीकरणाच्या कामाने गती काही घेतली नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून वाहनधारकांसह व्यापारी, उद्योजकांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.जळगावातील दालमिलमधून विदेशात डाळ निर्यात होण्यासह देशातही विविध भागात जाते. त्यात शेजारीच असलेल्या मराठवाड्यात दालमिलचा माल मोठ्या प्रमाणात जातो. मात्र जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अवजड वाहतूक करणे जिकरीची ठरत आहे. परिणामी या मार्गावरून डाळ, धान्याची वाहतूक करणे सध्या वाहनधारक टाळत आहे. जळगाव येथून पहूरसह सिल्लोड, औरंगाबाद, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणात डाळ जाते. सोबतच मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यात तिला मागणी आहे. त्यामुळे जळगावातून दररोज १५ ते २० ट्रकद्वारे त्या भागात डाळची वाहतूक केली जात असे. मात्र रस्त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली व जवळपास २०० टन डाळीची वाहतूक थांबली आहे.जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशातून आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता औरंगाबाद, लातूर, सिल्लोड या भागातून येणारा हरभरा, तूरही येत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे. लातूर येथील तूरला अधिक मागणी असल्याने तेथील कच्च्यामालापासून तयार तूर डाळ उत्पादनावरही अधिक भर असतो. मात्र सध्या या तुरीसह कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव