शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

२४ गावांत कौशल्य विकास केंद्रे पंतप्रधानांच्याहस्ते आज होणार ऑनलाईन उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 15:11 IST

ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागते‌.

कुंदन पाटील

जळगाव :  ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागते‌. अशावेळी गावातच रोजगार निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांना स्थानिक पातळीवर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्या अंतर्गत महाराष्ट्रात ५०० गावात यामध्ये जळगाव जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन १९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

जिल्ह्यात उद्घाटन होत असलेल्या २४ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऑनलाईन ऐकण्याची व्यवस्था राहणार आहे. १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यक्रम ऑनलाईन पार‌ पडणार आहे. या कार्यक्रमाचे जिल्ह्यातील निमंत्रक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे हे आहेत.‌

मारुळचा नकार...किनगावचा होकार

परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि.या संस्थेकरवी मारुळ (यावल) येथे केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र ग्रामपंचायतीने मात्र असमर्थता दाखविल्याने हे केंद्र किनगावला स्थापन होणार आहे. लोकसंख्या आणि दळणवळणाच्यादृष्टीने किनगाव सोयीस्कर असल्याने प्रशासनानेही याच ग्रामपंचायतीला प्राधान्य दिले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात वय वर्षे १८ ते ४५ दरम्यान इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.कौशल्य विकास केंद्रात विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, प्लंबिंग, मोबाईल रिपेअरिंग, सुतारकाम, कॉम्प्युटर आदीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.