शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कापसाच्या ट्रकने चिरडल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:14 IST

पाचोरा येथील अपघात : रस्ता ओलांडताना आईबाबांच्या डोळ््यांसमोरच अंत

वरखेडी, ता.पाचोरा : शेंदुर्णी येथून कापूस भरून गुजरात कडे जाणा?्या ट्रकने येथील सहावर्षीय बालिकेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली. प्रतीक्षा गोकुळ भिल्ल (वय ६) असे या बालिकेचे नाव आहे.लोहारी ग्रुप ग्राम पंचायतीशी संलग्न असलेल्या पाचोरा रोडला लागूनच वसलेल्या इंदिरा आवास या ५० ते ५५ घरांच्या छोट्याशा वस्तीतील सालदारकी करणारे दांपत्य गोकुळ महादू भिल्ल हे पत्नी लक्ष्माबाई व त्यांची मुले राहुल, खुशी, प्रतिक्षा व अरुण यांच्यासह बुधवारी सायंकाळी सप्तश्रृंगी गडावरून देवीचे दर्शन आटोपून आपल्या चौघा मुलांसह आपल्या गावी रिक्षाने आले. इंदिरा आवास वस्तीजवळ येथील प्रवाशांना उतरवण्यासाठी रिक्षा थांबली असता ही चारही मुले गाव आल्याच्या आनंदातच रिक्षातून उतरले. अवघ्या काही फुट अंतरावर नजरेसमोर आपली झोपडी दिसताच चौघे भाऊबहीण झोपडीच्या दिशेने रिक्षातून उतरून पळत सुटले. परंतु, रस्ता ओलांडत असताना विरूध्द दिशेने येणा?्या ट्रकने (जीजे-०२-एक्स-३२५७) प्रतिक्षा हिला जोरदार धडक दिल्याने आई-वडिलांच्या डोळ््यांसमोर ही बालिका जागीच ठार झाली. यावेळी आईबाबांनी एकच हंबरडा फोडला. आई-वडलांनी इतर तिघांना क्षणात मागे ओढले म्हणून इतर ती मुले बालंबाल बचावली.पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे हे घटनास्थळी आपल्या कर्मचा?्यांसह तत्काळ पाहचले. यावेळी नातेवाईकांनी आधी पंचनामा करा व मगच मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी हलवा, असा आग्रह धरला होता. परंतु गावातील काही व्यक्तींनी मध्यस्थी करीत मृत बालिकेच्या आई-वडीलांसह नातेवाईकांना समजवले. त्यानंतर पाचोरा ग्रामीण रूग्णालयात बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.सदरचा ट्रक पिंपळगाव (हरे.) पोलिसांनी ताब्यात घेऊन जमा केला असून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.प्रतीक्षा ही अंगणवाडीत शिकत होती. तिच्यापेक्षा भाऊ राहुल, बहीण खुशी थोरले असून तिच्या पाठीवर अरूण हा लहान भाऊ आहे. तिच्या अशा अपघाती निधनाने इंदिरा आवास वस्तीवर शोककळा पसरली आहे.दरम्यान, वरखेडी-पाचोरा रस्यावर पंधरा दिवसात ही तिसरा अपघात आहे.