शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

बीडीओंसह सहा जणांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST

बीडीओंसह सहा जणांवर खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा अमळनेर : महिला सरपंचावर अपहाराचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर (जि. ...

बीडीओंसह सहा जणांवर

खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा

अमळनेर : महिला सरपंचावर अपहाराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर (जि. जळगाव) : मागासवर्गीय महिला सरपंचावर अपहाराचा आरोप करून त्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमळनेरचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मठगव्हाण येथील तत्कालीन सरपंच मायाबाई प्रवीण वाघ यांनी याबाबत फिर्याद दिली. त्या २२ फेब्रुवारी २०१८ पासून सरपंचपदाचा कारभार पाहत होत्या. त्यावेळी बीडीओंनी वैयक्तिक शौचालय बांधकाम कामाबद्दल वर्गणीच्या नावाखाली एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच ग्रामसेवकपद रिक्त असल्याने त्याबाबत तक्रार केली असता त्यांनी अश्लील व जातिवाचक शब्द वापरले. त्यामुळे वाघ यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.

मात्र, सभापतींनी राजीनामा नामंजूर करून गटविकास अधिकारी यांची माफी मागायला लावली. यानंतर बीडीओंनी सदस्यांना हाताशी धरून चौकशी सुरू केली. त्यासाठी दोन विस्तार अधिकारी नेमण्यात आले. या अधिकाऱ्यांनी ५० हजारांची खंडणी मागितली. नंतर आपणास अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठविला. यानंतर सुनावणीसाठी बोलावले असता शाळा दुरुस्ती व मुलींच्या शौचालय बांधकामाबाबत ५ लाख ७७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला. त्यावेळी आपण पदावर नव्हतो, असे वाघ यांचे म्हणणे आहे.