लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : गेल्या दोन वर्षांपासून मुक्ताईनगर तालुक्यात मोटारसायकल चोरी जाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढले होते. त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर येथीलच आकाश विष्णू रावळकर या तरुणास चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड तसेच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, सहायक फौजदार सुधाकर शेजोळे, संतोष नागरे, गणेश चौधरी, देवसिंग तायडे, नितीन चौधरी, किशोर केदारे, अनिल सोनवणे, भगवान पाटील, सचिन जाधव, संजय लाटे, सागर सावे यांच्या पथकाने सापळा रचून रावळकर यास अटक केली. तपास सहायक फौजदार सादिक पटवे करत आहेत.
त्याच्या ताब्यातून विविध कंपनींच्या एकूण सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यामधील एक मोटारसायकल मुक्ताईनगर, तर एक मोटारसायकल शपूर (मध्य प्रदेश), दोन शेगाव, एक बऱ्हाणपूर व जळगाव जामोद एक अशा ठिकाणच्या चोरीच्या मोटारसायकली आहेत.
बऱ्हाणपूर येथील गाडीसंदर्भात मात्र कुठेही गुन्हा दाखल झाला नाही. इतर पाच मोटारसायकलींचा गुन्हा जाता पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहेत.
पोलिसांनी आरोपी अटक केल्यामुळे अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.