शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या 'तिघा' सायकलवीरांचे सहाशे कि.मी. बीआरएमसाठी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 19:05 IST

४० तासात सहाशे कि.मी. अंतर पार करण्याचे लक्ष्य आहे.

ठळक मुद्दे४० तासात सहाशे कि.मी. अंतर पार करण्याचे लक्ष्यशनिवारी फिरणार सायकलीची चाके

चाळीसगाव : दोनशे, तीनशे व चारशे कि.मी. बीआरएम सायकल स्पर्धेत यशस्वी झालेल्या चाळीसगावच्या तिघा सायकलवीरांनी शुक्रवारी धुळे येथे होणा-या सहाशे कि.मी. बीआरएम स्पर्धेसाठी सायंकाळी साडेपाच वाजता प्रस्थान केले. बीआरएमचा मराठी अर्थ 'जगभर रपेटीला कुठेही जाणारा असा आहे. ' ही स्पर्धा शनिवारी सहा वाजता धुळे येथील देवपूर बसस्थानकापासून सुरू होत आहे. यावेळी यासायकलवीरांना चाळीसगाव सायकलिंग गृपतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.४५ वर्षीय टोनी पंजाबी, ४३ वर्षीय अरुण महाजन व ५९ वर्षीय रवींद्र पाटील यांनी नुकतीच ४०० कि.मी. बीआरएम सायकलिंग स्पर्धा २४ तासात पूर्ण केली होती. यासाठी २७ तासाचे टार्गेट दिले होते. धुळेकडे स्पर्धेसाठी रवाना होताना शुभेच्छा देण्यासाठी वास्तूरचनाकार सुनील बंग, अनिल बंग, सायकलिस्ट सोपान चौधरी, कवी व साहित्यिक जिजाबराव वाघ आदी उपस्थित होते.  आज सहाशे कि.मी.साठी मारणार पायंडलदोनशे, तीनशे आणि चारशे कि.मी.चे अंतर पार केल्यानंतर टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन यांच्या सायकली १३ रोजी धुळे येथून ६०० कि.मी. बीआरएमसाठी धावणार आहेत. धुळे येथून सकाळी सहा वाजता स्पर्धेची शिट्टी वाजेल. मध्य प्रदेशातील टिकरीपर्यंत जाऊन आल्यानंतर नाशिककडे आगेकूच करायची आहे. नाशिकहून पुन्हा धुळे गाठून ४० तासात ६०० कि.मी.चा पल्ला या सायकलवीरांना गाठायचा आहे. विशेष म्हणजे ४०० कि.मी.ची स्पर्धा झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ते ६०० कि.मी. स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. गेले चार दिवस तिघांनी पुन्हा दरदिवशी १०० कि.मी.चा कसून सराव केला. 

 चाळीसगावचा झेंडा रोवणार६०० कि.मी.ची सायकल बीआरएम यशस्वी केल्यानंतर आम्हाला एसआर अर्थात सुपर राईंडरचा किताब मिळणार आहे. आम्ही स्पर्धा जिंकून यशाचा झेंडा फडकवूच. एसआरच्या मानाचा तुरा देखील चाळीसगावच्या मुकूटात खोवण्यासाठी आम्ही आतूर आहोत.- टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन, हौशी सायकलिस्ट, चाळीसगाव

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव