शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:35 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देभुसावळ शहरात ऑक्टोबर महिन्यात चार घरफोडय़ा घरफोडी व एक दुचाकी चोरल्याची कबुली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13- जिल्ह्यातील मोठय़ा शहरात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून 40 हजार 500 रुपये रोख, दोन कॅमेरे, सोने-चांदीचे दागिने व दुचाकी असा 84 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने एकटय़ा भुसावळ शहरात ऑक्टोबर महिन्यात चार घरफोडय़ा केल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये आकाश भानदास गोरखा (19), अभिषेक प्रदीप भालेराव (19) दोन्ही रा.रेल्वे क्वार्टर, भुसावळ, आकाश उर्फ टेके शाब्बास रामटेके (20, रा.लिटी, जि.चंद्रपुर, ह.मु.भुसावळ), आकाश रमेश परदेशी (वय 21, रा. कवाळे नगर, भुसावळ), भूषण नाना राठोड (22 रा.भुसावळ) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.रेल्वेचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सिध्दीश ईश्वरचंद जायस्वाल (47, रा.रेल्वे ऑफिसर कॉलनी, भुसावळ) यांच्याकडे 17 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत 18 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना आकाश गोरखा हा हाती लागला. त्याची चौकशी केली असता अभिषेक भालेरावचे नाव पुढे आला. पोलीस चौकशीत घरफोडी करणारी सहा जणांची टोळी असून आकाश रामटेके हा मुख्य सूत्रधार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने रामटेके याला ताब्यात घेतले. चौकशीत आणखी तीन जणांची नावे पुढे आली. त्यानुसार आकाश परदेशी, भूषण राठोड व एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. या सहा जणांना एकत्र आणल्यावर त्यांनी भुसावळ शहरात चार ठिकाणी घरफोडी व एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे 40 हजार 500 रुपये रोख मिळून आले. त्यानंतर दुचाकी (क्र.एम.एच.19 ए.एच.3600) , सोने-चांदीचे दागिने व दोन कॅमेरे असा मुद्देमाल हस्तगत केला.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पथकातील सहायक निरीक्षक राजेंद्र होळकर, सागर शिंपी, कर्मचारी रवींद्र पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश महाजन, विजय पाटील, संजय पाटील, युनुस शेख, विलास पाटील, दीपक पाटील, नरेंद्र वारुळे, प्रवीण हिवराळे, अशोक पाटील, शरद सुरळकर व गायत्री सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.