शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

 घरफोडी करणारी भुसावळ येथील सहा जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:27 IST

जिल्ह्यातील मोठ्या शहरात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून ४० हजार ५०० रुपये रोख, दोन कॅमेरे, सोने-चांदीचे दागिने व दुचाकी असा ८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने एकट्या भुसावळ शहरात आॅक्टोबर महिन्यात चार घरफोड्या केल्या आहेत. 

ठळक मुद्देएलसीबीची कामगिरी  भुसावळ शहरात केल्या ४ घरफोड्या८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : जिल्ह्यातील मोठ्या शहरात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून ४० हजार ५०० रुपये रोख, दोन कॅमेरे, सोने-चांदीचे दागिने व दुचाकी असा ८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने एकट्या भुसावळ शहरात आॅक्टोबर महिन्यात चार घरफोड्या केल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये आकाश भानदास गोरखा (वय १९), अभिषेक प्रदीप भालेराव (वय १९) दोन्ही रा.रेल्वे क्वार्टर, भुसावळ, आकाश उर्फ टेके शाब्बास रामटेके (वय २०, रा.लिटी, जि.चंद्रपुर, ह.मु.भुसावळ), आकाश रमेश परदेशी (वय २१, रा. कवाळे नगर, भुसावळ), भूषण नाना राठोड (वय २२ रा.रेल्वे कॉलनी, भुसावळ) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

रेल्वे वैद्यकिय अधिका-याकडे केली घरफोडीरेल्वेचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सिध्दीश ईश्वरचंद जायस्वाल (वय ४७, रा.रेल्वे आॅफिसर कॉलनी, भुसावळ) यांच्याकडे १७ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व आतील दरवाजाचे पॅनल काढून १८ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. घरफोडीचे दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना स्वतंत्र पथक तैनात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भुसावळातील गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या टोळीचा सुगावा लागला.

एकाला पकडल्यानंतर पाच जण समोरया गुन्ह्याचा तपास करीत असताना आकाश गोरखा हा पथकाच्या हाती लागला. त्याची चौकशी केली असता अभिषेक भालेरावचे नाव पुढे आला. या दोघांकडून चोरीच्या इलेक्ट्रनिक्स वस्तू हस्तगत केल्यानंतर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस चौकशीत घरफोडी करणारी सहा जणांची टोळी असून आकाश रामटेके हा मुख्य सूत्रधार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने रामटेके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आणखी तीन जणांची नावे पुढे आली. त्यानुसार आकाश परदेशी, भूषण राठोड व एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. या सहा जणांना एकत्र आणल्यावर त्यांनी भुसावळ शहरात चार ठिकाणी घरफोडी व एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.