शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले सहा जणांचे लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:58 IST

संतप्त कजगावकरांनी कुत्र्याला केले ठार

कजगाव, जि. जळगाव : पिसाळलेल्या कुत्र्याने कजगावात धुमाकूळ घातला असून बुधवारी रात्री पाच ते सहा जणांना चावा घेत त्यांचे लचके तोडले. त्यांच्यावर कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्यांना धुळे येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, गुरुवारी सकाळी संतप्त गावकऱ्यांनी एकत्र येत या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले.जुने गाव, जीन परीसर, सी.टी. पाटील नगर, कजगा- भडगाव मार्ग या भागात पिसाळलेल्या कुत्र्याने २३ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान धुमाकूळ घालत एका पतसंस्थेचे संचालक शिवाजी बोरसे तसेच येथील रहिवासी तबसूम इम्रान खाटीक, राहुल गोपाळ सोनवणे, गणेश सुरेश खैरनार, ज्ञानेश्वर रमेश महाजन यांना चावा अक्षरश: लचके तोडले. रक्तबंबाळ झालेल्या वरील सर्व जणांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले.पिसाळलेल्या कुत्र्यामुळे लहान मुले व महिला वर्गात भीती निर्माण झाली होती. नागरिकांनी एकत्र येत धुमाकूळ घालणाºया कुत्र्याचा रात्रभर शोध घेतला. मात्र या कुत्र्याचा शोध लागला नाही. मात्र सकाळी गावकºयांनी या कुत्र्यास घेराव घालून त्यास यमसदनी पाठविले.कजगाव येथील जीन भागातील ज्ञानेश्वर महाजन या बालकास तर या पिसाळलेल्या कुत्र्याने चक्क शंभर ते दीडशे मीटर फरफटत नेले मात्र याच कॉलनीतील महिला धावल्यामुळे मोठा अनर्थ टळला तर दुसºया एका घटनेत कजगाव भडगाव मार्गावरून जाणाºया दुचाकीवर झडप घालत या मागे बसलेल्या इसमाही लचका तोडला. प्रसंगावधान राखल्याने अपघात टळला. सी.टी.पाटील नगरातील एक लहान बालक शाळेतून घरी जात असताना या कुत्र्याच्या तोंडात या बालकांचे शाळेचे दप्तर आल्याने या त्यामुळे बालक बचावला.‘मॉर्निंग वॉक’वर कुत्र्याची दहशतगावात पिसाळलेल्या कुत्र्याच्या धुमाकूळ मुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली होती. या मुळे गुरुवारी गावातील सर्वच रस्ते ओस पडले होते. कजगावात ‘मॉर्निंग वॉक’साठी फिरणारी गर्दी जास्त असते मात्र पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशत मुळे सारे रस्ते ओस पडली होती.पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेला ज्ञानेश्वर महाजन.

टॅग्स :Jalgaonजळगाव