शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

सहा कोविड सेंटरला एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 23:33 IST

अमळनेर तालुक्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण अर्ध्या टक्क्यांवर आली आहे.

ठळक मुद्देएक्सरे , सीटी स्कॅन, ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठीची धावपळ थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शासनाचे लॉकडाऊन, प्रशासकीय अधिकाऱ्यांची कठोर अंमलबजावणी, डॉक्टरांची मेहनत या समन्वयामुळे अमळनेर तालुक्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण अर्ध्या टक्क्यांवर आली आहे.  सहा कोविड रुग्णालयात रुग्ण संख्या शून्यावर आल्याने जनतेसह रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यामुळे एक्सरे, ऑक्सिजन, रेमडेसिविर,सीटी स्कॅन यासाठी भटकंती थांबली आहे.

तालुक्यात ११ कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यात २७२ रुग्णांची क्षमता होती मात्र गंभीर परिस्थितीत क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात रुग्ण दाखल करण्याची वेळ आली होती.  गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाली आहे.  मृत्यूदर देखील शून्यावर आला आहे. प्रांताधिकारी सीमा अहिरे, डीवायएसपी राकेश जाधव,तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचारी पथक रस्त्यावर उतरून दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे  गर्दी ओसरू लागली होती. लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोर झाली त्यामुळे शासकीय कोविड रुग्णालय इंदिरा भुवन ,डॉ. किरण बडगुजर,  डॉ. हेमंत कदम, डॉ.  चव्हाण, डॉ.  विनोद पाटील  यांच्या कोविड सेंटरला रुग्ण संख्या शून्य झाली आहे. उर्वरित ५ कोविड सेंटरला ३० रुग्ण उपचार घेत आहेत त्यात ग्रामीण रुग्णालयात १० रुग्ण असून ३ गंभीर आहेत. 

पॉझिटिव्हिटी अवघी अर्धा टक्का आहे. ग्रामीण भागात २६२  पैकी १ तर शहरी भागात ५०२ पैकी ३ पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या कमी झाली तसेच रेमडेसिविर तुटवडा देखील संपला आहे, एक्सरे मशीन आणि एचआर सीटी स्कॅनिंग देखील करण्याची गरज आता भासत नाही. ऑक्सिजन तुटवडा संपला आहे.

-डॉ. संदीप जोशी, अमळनेर.

 ग्रामीण भागातीलही संसर्ग कमी झाला आहे. एक कोविड हेल्थ आणि एक कोविड केअर सेंटर बंद केले आहे. नियमांच्या पालनाने सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. 

-डॉ. प्रकाश ताडे, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.

रुग्ण संख्या आणि मृत्यू शून्य येईपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे नागरिक, दुकानदारांनी नियमांचे पालन करावे. पुढचा धोका आपल्याच लहान मुलांना आहे, हे लक्षात घ्यावे. 

-सीमा अहिरे, प्रांताधिकारी, अमळनेर

म्हसवे येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण

पारोळा : शहरासह तालुक्यात दि. २० रोजी एकूण ३३० लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्यात. यात फक्त म्हसवे, ता. पारोळा येथे एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. यामुळे कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र अहवालावरून पाहण्यास मिळत आहे. यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्या