शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

पाणी गळतीला बसणार आळा

By admin | Updated: August 1, 2014 15:21 IST

पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला.

जळगाव : मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत त्यातील ४७ टक्के पाणी वाया जात असल्याचा अहवाल सुजल निर्मल अभियानांतर्गत नेमलेल्या नागपूरच्या एडीसीसी इन्फोकॅड प्रा.लि. या मक्तेदार कंपनीने सर्वेक्षणाअंती सादर केला आहे. ही पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच या अभियानांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला. 

२ महिने ठेवणार मीटर
वितरण वाहिन्यांवर शहरातील विविध २00 ठिकाणी वॉटर मीटर बसविण्यास तब्बल १ महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे मीटर २ महिने ठेवून पाण्याच्या नोंदी घेतल्या जाणार आहे. त्यामुळे मनपा टाकीतून किती पाणी पुरविते व नागरिकांपर्यंत किती पोहोचते? याची आकडेवारी समोर येणार आहे.
अवैध नळकनेक्शनही सापडणार
या प्राथमिक सर्वेक्षणानुसार मनपाकडील २0११-१२ मधील नळजोडणीची अधिकृत संख्या ५९५७७ असताना प्रत्यक्षात ६२ हजार ३५७ नळजोडणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी काही नळजोडणी ही या वर्षात झालेली असण्याची शक्यता आहे. त्याची कागदोपत्री पडताळणी केल्यानंतर अवैध नळकनेक्शन कोणते? व किती? याची माहिती उपलब्ध होईल. तसेच एसएमएसद्वारे अवैध नळकनेक्शनबाबत माहिती मागविण्यात येणार आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. 
त्यामुळे अवैध नळकनेक्शन धारकांकडून दंड वसूल करून ते नियमित करून घेतले जातील. परिणामी मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
उत्पन्नात ३१ टक्के नुकसान
गळत्या, यंत्रसामुग्रीची निगा न राखणे, अवैध नळ कनेक्शन, वसुलीत येणारी घट आदी कारणांमुळे मनपाला पाणीपट्टीच्या उत्पन्नात ३१ टक्के नुकसान सोसावे लागत आहे. त्यापैकी बिल तयार करण्यातील नुकसान ४ टक्के आहे. म्हणजेच अवैध नळ कनेक्शनमुळे ४ टक्के बिले दिलीच जात नाहीत. तर वसुलीतील नुकसान २७ टक्के आहे. 
मनपाची पाणीपट्टीची सध्याची एकूण मागणी २३.५0 कोटी असताना एकूण पाणी वितरणावर २६ कोटी रुपये खर्च होत आहे. सुजल निर्मल अभियानांतर्गत ४२ टक्क्यांपैकी किमान ३0 टक्के पाणी गळती रोखण्यात यश येईल. त्यामुळे महसुली खर्च ७ कोटी रुपयांनी कमी होऊन पाणी योजनेचा खर्च केवळ १९ कोटींवर येणार आहे. टाक्यांवर बसविले ३१ मीटर याच अभियानांतर्गत आधी वाघूर धरणातून उपसा करणार्‍या पंपींग स्टेशनपासून ते शहरातील पाण्याच्या टाक्यांदरम्यानची पाणी गळती मोजण्यासाठी पंपींग स्टेशन व टाक्यांवर एकूण ३१ वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत. तर जलशुद्धीकरण केंद्रावर २ वॉटर मीटर बसविणे बाकी आहे. नासाडीची आकडेवारी ■ धरणातून येणार्‍या रॉ-वॉटरची व एमबीआर टाकीवरून नासाडी- १२ टक्के
■ वितरण वाहिनीवरील नासाडी- ३२.३७ टक्के
■ एकूण पाण्याची नासाडी- ४७ टक्के.
■ एकूण पाणीपट्टीच्या उत्पन्नातील नुकसान- ३१ टक्के.