शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात चांदीच्या भावात दीड हजार रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:15 IST

महिनाभरात ३००० रुपयांनी वाढ

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्कर सक्रीय झाल्याने व चीन सोबतच्या व्यापार युद्धाच्या मुद्यावरून चांदीच्या भावात एकाच दिवसात तब्बल दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागणी नसताना ही वाढ झाली असून यामुळे सराफ व्यावसायिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चांदीचे भाव वाढले असले तरी सोन्याच्या भावात मात्र १०० रुपये प्रती तोळ््याने घसरण झाली आहे.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भावाचाही मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीची तस्करी वाढून त्यांच्या भावात कृत्रिम वाढ होत आहे.यात भरात भर म्हणजे अनेक देशांनी चीनकडून साहित्य खरेदी न करण्याची तयारी सुरू केल्याने एक प्रकारे चीन सोबत व्यापार युद्धच सुरू झाले आहे. त्यामुळे ब्राझील, स्पेन, जर्मनी, लंडन, येथून येणाऱ्या चांदीच्या भावावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीचे भाव वधारले. त्यामुळे भारतातही हे भाव वाढले आहेत.महिनाभरात चांदी तीन हजार रुपयांनी वाढलीआंतरराष्ट्रीय पातळीवर तस्कर सक्रीय झाल्याने १९ जून रोजी सोन्यासह चांदीच्याही भावत मोठी वाढ झाली होती. त्या दिवशी चांदी ५०० रुपये प्रती किलोने वाढली व ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली होती. त्यानंतर ५ जुलै रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती किलो चांदीचे भाव झाले. ११ जुलै रोजी चांदीने ४० हजार रुपये प्रती किलोचा टप्पा गाठला. तेव्हापासून १७ जुलैचा अपवाद (३९ हजार ५०० रुपये प्रती किलो) चांदी ४० हजार रुपयांवर होती. त्यानंतर २३ जुलै रोजी एकाच दिवसात थेट दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन चांदी ४१ हजार ५००रुपयांवर पोहचली.सोन्याच्या भावात घसरणतस्करांच्या सक्रीयतेमुळे या वेळी चांदीचे भाव वाढले असले तरी सोन्याच्या भावात मात्र १०० प्रती तोळ््याने घरसण होऊन ते ३५ हजार २०० रुपयांवरून ३५ हजार १०० रुपयांवर आले आहे.मागणी नसताना चांदीचीभाववाढएरव्ही दरवर्षी जुलै, आॅगस्ट महिन्यात सोने-चांदीचे भाव कमी होतात. मात्र या वेळी जुलै महिन्यात चांदीचे भाव मागणी नसताना वधारले आहे.चीनसोबतच्या व्यापार युद्धामुळे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे चांदीचे भाव वधारले आहे. त्यामुळे भारतातही हे भाव वाढले आहेत.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव