शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

चांदीचा भाव १.८० लाखावर, एका दिवसात ११ हजारांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:34 IST

वाहनांच्या वेगवेगळ्या भागासह इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये चांदीची आवश्यकता असते. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी असल्याने जगभरात चांदीचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

विजयकुमार सैतवाल -

जळगाव : दिवसेंदिवस वाढत जाणारा तुटवडा व त्यात वाढती मागणी यामुळे चांदीचे भाव झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी (दि. १३)  एकाच दिवसात चांदीच्या भावात ११ हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८० हजार रुपयांवर पोहोचली. सोन्याच्याही भावात एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले. 

वाहनांच्या वेगवेगळ्या भागासह इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये चांदीची आवश्यकता असते. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी असल्याने जगभरात चांदीचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

गेल्या पाच वर्षांतील चांदीतील भाववाढदिनांक    झालेली वाढ    भाव१३ ऑगस्ट २०२०    ४०००    ६७,५००४ ऑक्टोबर २०२२    ५०००    ६२,०००५ एप्रिल २०२३    २९००    ७५,०००२३ ऑक्टोबर २०२४    १५००    १,००,०००२७ सप्टेंबर २०२५    ३८००    १,४४,०००ऑक्टोबर महिन्यातील भाववाढ९ ऑक्टोबर २०२५    ११,२००    १,६४,०००१० ऑक्टोबर २०२५    ३०००    १,६७,०००११ ऑक्टोबर २०२५    २०००    १,६९,०००१३ ऑक्टोबर २०२५    ११,०००    १,८०,००० 

जागतिक पातळीवर चांदीचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बुकिंग केल्यानंतर चांदी दीड महिन्यानंतर मिळत आहे. भाव दोन लाखांपर्यंत जाऊ शकतात. सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक

पाच दिवसांत दोन वेळा ११ हजारांनी वाढसातच दिवसांत चांदीचे भाव प्रतिकिलो २९ हजार ४०० रुपयांनी वधारले. ६ ऑक्टोबर रोजी चांदी एक लाख ५० हजार ६०० रुपयांवर होती. ती १३ ऑक्टोबर रोजी एक लाख ८० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. पाच दिवसांपूर्वी, ९ ऑक्टोबर रोजी चांदीमध्ये ११ हजार २०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा १३ ऑक्टोबर रोजी ११ हजारांची वाढ झाली आहे. 

बुकिंगनंतर दीड महिन्यानंतर मिळते : जगभरात चांदीसाठी अगोदर बुकिंग करून ठेवावे लागत आहे. बुकिंगनंतरही तब्बल दीड महिन्यानंतर चांदी मिळत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Silver Price Soars to ₹1.8 Lakh, ₹11,000 Increase in a Day

Web Summary : Silver prices surged to ₹1.8 lakh, a single-day increase of ₹11,000, driven by global shortages and high industrial demand. Gold also rose. Silver is delayed one and half months after booking. Experts predict further price increases.
टॅग्स :SilverचांदीMarketबाजार