शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

खाविआच्यावतीने मांडण्यात आली बाजू

By admin | Updated: January 11, 2017 00:37 IST

वसुली : मनपा शुक्रवारी मांडणार बाजू

जळगाव : मोफत बससेवा योजना, घरकूल आदी विविध योजनांमुळे तत्कालीन नपाचे सुमारे 60 कोटीचे नुकसान केल्याप्रकरणी 53 नगरसेवकांना मनपा प्रशासनातर्फे प्रत्येकी 1 कोटी 16 लाखांची नोटीस बजावल्याप्रकरणी खाविआतर्फे माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत मंगळवारी कामकाज झाले. त्यात खाविआतर्फे अॅड.पी.एम.शहा यांनी नगरसेवकांना नोटीस बजावण्यापूर्वी मनपाने सुनावणी घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत ही नोटीस रद्द करण्याची मागणी केली. त्यावर न्या.घुगे यांनी मनपाला या विषयावर शुक्रवार, 13 रोजी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

सुनावणी न घेताच ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ही नोटीस बोगस असून ती रद्द करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने नगरसेवकांना नोटीस देण्यापूर्वी मनपाने सुनावणी घेतली होती का? याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश मनपाचे वकील अॅड.पी.आर.पाटील यांना दिले आहेत.

मागील मनपा निवडणुकीच्या तोंडावर 53 नगरसेवकांना लेखापरिक्षणातील आक्षेपांच्या आधारे 1 कोटी 16 लाख रुपये वसुलीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यास नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगिती मिळविली होती. त्यानंतर मनपाने केलेल्या अपिलावर न्यायालयाने स्थगिती रद्द केली होती. त्याविरोधात खाविआतर्फे माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी दावा दाखल करीत आधीचा दावा रिस्टोअर करण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य करीत मंगळवारी याप्रकरणी कामकाज ठेवले होते. त्यात खाविआतर्फे अॅड.पी.एम. शहा यांनी बाजू मांडली. मनपाने नगरसेवकांना वसुलीची नोटीस काढण्यापूर्वी त्याची सुनावणी घेणे आवश्यक होते, मात्र सुनावणी न घेताच नोटीस बजावण्यात आली होती.