शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथे आजपासून श्री संत सोपान काका समाधी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 18:14 IST

मुक्ताईनगर : तालुक्यातील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही सलग चौथ्या वर्षी श्री संत मुक्ताई ...

ठळक मुद्दे२७ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत होणार कार्यक्रमसोहळ्यात शिवपुराण कथा, महारुद्र याग व नामसंकीर्तन सोहळा

मुक्ताईनगर : तालुक्यातील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही सलग चौथ्या वर्षी श्री संत मुक्ताई वारकरी सेवा समितीतर्फे श्री संत सोपानकाका समाधी सोहळा २७ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित केला आहे.श्रीसंत सोपानकाका समाधी सोहळ्याच्या निमित्त शिवपुराण कथा, महारूद्र याग व नामसंकीर्तन सोहळा होणार आहे. शिवपुराण कथा प्रवक्ते श्रीहभप निरंजन भाईजी महाराज शिंदे श्रीक्षेत्र आळंदी हे राहतील. महारूद्र यागामध्ये पुरोहित व ब्रह्मवृंद शारंगधर महाराज व अतुल महाराज यावलकर राहतील. कलशपूजन श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज संजय महाराज देहूकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन रामराव महाराज मेहूणकर यांच्याहस्ते तर विणा व ग्रंथपूजन बाबुराव महाराज देवकर यांच्या हस्ते होणार आहे. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे पाच ते सहा काकड आरती, सकाळी ८ ते १० महारूद्र याग, सकाळी १० ते १२ हरिकीर्तन, दुपारी २ ते ५ शिवपुराण कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन आणि त्यानंतर हरिजागर होणार आहे. गुरूवार, २७ रोजी तुकाराम महाराज सखारामपुरकर व माधवदास महाराज राठी, २८ रोजी रामकृष्ण महाराज सानप येवला व प्रभाकर दादा महाराज बोधले पंढरपूर, २९ रोजी दीपक महाराज शेळगावकर व रामेश्वर महाराज शास्त्री मुंबई, ३० रोजी सुनील महाराज झांबरे बीड व मुरारी महाराज नामदास पंढरपूर, ३१ रोजी सुशांत महाराज फुलंब्री व बाबासाहेब महाराज इंगळे बीड, १ जानेवारी रोजी प्रकाश महाराज जवंजाळ चिखली व पद्माकर महाराज देशमुख अमरावती, २ रोजी भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड व श्रीपाद महाराज भडंगे सोलापूर यांची कीर्तने होणार आहे. समारोपाच्या दिवशी ३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद वितरण होईल, असे आयोजक श्रीसंत मुक्ताई वारकरी सेवा समिती श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर यांनी कळविले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर