जळगाव : उड्डाण योजनेतंतर्गंत जळगाव-मुंबई विमानसेवा रविवारी पुन्हा सुरु झाली. अहमदाबादहून सकाळी ठीक १० वाजून ३५ मिनिटांनी विमानाचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यात ६२ प्रवाशी होते. ४० मिनिटांच्या विश्रांतीनंतर जळगावातील ५८ प्रवाशांना घेऊन, हे विमान मुंबईच्या दिशेने झेपावले.अहमदाबादहून विमान आल्यानंतर खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी प्रवाशांचे स्वागतकेले. सकाळी खासदार पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालन होऊन, विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष भरत अमळकर, जळगाव विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुनील मुगरीवार, कॅटचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, दालमिल असोसिएशनचे प्रेम कोगटा, गनी मेमन व ट्रू जेटचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.तीन महिन्यात नाईट लॅँडींगची सुविधायेथील विमानतळावर तीन महिन्यात नाईट लॅँडीगची सुविधा सुरु होणार असल्याची माहिती खासदारांनी पत्रकार परिषदेत दिली. विमानतळ प्रशासनातर्फे १४ पैकी ७ बाबींची पूर्तता केलेली आहे, उर्वति ७ बाबींची पूर्तता केली जाईल. विमानसेवेमुळे आयात व निर्यातसह बाहेरील उद्योगांना शहरात चालना मिळणार आहे.
जळगाव-मुंबई विमानसेवेचा श्री गणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:36 IST