शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ७४ दिवसानंतर आज उघडणार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:44 IST

एक दिवसाआड : हॉटेल, मद्य विक्री बंदच

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू शिथिलता दिली जात असली तरी ७४ दिवसानंतर दुकाने सुरू करताना सम-विषम पद्धतीने सुरू होणार असल्याने दुकानदारांना एक दिवसआड दुकाने उघडावी लागणार आहे. त्यात संकुलास परवानगी नाकारण्यात आली असून शहरातील बहुतांश दुकाने मात्र व्यापारी संकुलात असल्याने त्यांच्यापुढे व्यवसायाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात हॉटेल, मद्य विक्रीला परवानगी नसल्याने हे व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान दुकाने उघडी असतील.इतर व्यवसायिकही चिंतेत५ जूनपासून काही दुकाने सुरू होणार असली तरी ती पी-१ व पी-२ अर्थात सम विषम पद्धतीने सुरू करण्याचे राज्य शासनाच्या आदेशात म्हटले आहे. प्रशासनाने आदेश काढताना राज्य सरकारच्या आदेश क्रमांकाचा उल्लेख करीत ते लागू राहतील असे म्हटले आहे. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांना दररोज दुकान उघडता येणार नाहीत. परिणामी शहरातील एका बाजूची दुकाने ५ जून रोजी उघडल्यास ६ रोजी ते बंद राहतील व त्या दिवशी त्याच्या विरुद्ध बाजूचे दुकान सुरू राहतील. दोन महिन्यांनंतरही काही दुकाने बंदच राहणार असल्याने व्यापार संकटात सापडला असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.जळगावबाबत दुजाभावअनलॉक-१ मध्ये व्यवहार सुरू होत असले तरी जळगावातील इतर व्यवहाराबाबत इतर शहरांच्या तुलनेत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला जात आहे. जळगावपेक्षा मोठ्या महापालिका व जेथे जळगावपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे, तेथे मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जळगावात ही परवानगी मिळत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. नाशिक, नांदेडसह इतर मनपा क्षेत्रात ही परवानगी देण्यात आली असून जळगावतही परवानगी मिळण्याची मागणी केली जात आहे. या सोबतच हॉटेल सुरू करण्याबाबतही निर्णय होत नसल्याने हे व्यावसायिकही चिंतेत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव