पहूर ता.जामनेर : मुकबधीर व अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन युवकाने केलेल्या अत्याचारातून पीडिता गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार कसबा पिंप्री गावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन युवकाविरूध्द पहूर पोलिसात गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अल्पवयीन युवकाने पिडीत मुलीच्या घरात बळजबरीने घुसून अत्याचार केला आहे. या प्रकारानंतर पिडित युवती गरोदर असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अल्पवयीन युवकाविरूध्द बाल लैंगिक अत्याचार सरंक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई येथे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पहूर पोलिसांकडे तो वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संबधित संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे आहे.
धक्कादायक : मुकबधीर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:53 IST
मुकबधीर व अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन युवकाने केलेल्या अत्याचारातून पीडिता गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार कसबा पिंप्री गावात उघडकीस आला आहे.
धक्कादायक : मुकबधीर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
ठळक मुद्देअत्याचारानंतर पीडित मुलगी गर्भवतीअल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसात गुन्हा