शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..फळ्यावर उत्तरे लिहून दिली जातेय संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 21:55 IST

महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरु असल्याच ेआहे.

ठळक मुद्दे शिक्षणाचा खेळखंडोबा गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची धडपडसोयीनुसार घेतल्या जात आहेत परीक्षा

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.१०-महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरु असल्याच ेआहे.

 शाळेच्या निकालावरुन गुणवत्ता सिद्ध होणार असल्याने हा‘उद्योग’सुरु आहे. त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची नाराजी सुज्ञ नागरिकाकडून व्यक्त होत आहे.

८ नोव्हेंबरपासून या परीक्षा घेण्यात येत असून, जिल्'ातील५ लाख ६२ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यासाठी विद्यार्थी प्राधिकरणाकडून जिल्'ातील प्रत्येक शाळेत परीक्षेआधी  प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या होत्या. मात्र परीक्षा सुरु झाल्यानंतर काही शाळांमध्ये शिक्षक सर्व उत्तरे थेट फळ्यावर लिहून देतआहेत. प्रगत शैक्षणिक अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना प्रगत बनविण्याचे धोरण शासनाने अवलंबिले असताना एकीकडे विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे लिहूनदिली जात असल्याने संकलित चाचणी परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळविणे आवश्यकसंकलित चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शाळेच्या निकालावरुन शाळेची गुणवत्ता सिध्द होणार असल्याने, विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षकांकडून दिली जात आहे. शाळेची गुणवत्ता कशाप्रकारे कायम राहिल यासाठीच शिक्षकांचा खटाटोप सुरु आहे. तसेच अनेक शिक्षकांना संकलित चाचणीबाबतचे मूल्यांकन कसे राहिल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका शिक्षकांकडूनच सोडविल्या जात आहेत.

सोयीनुसार घेतल्या जात आहेत परीक्षा८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षांसाठी सकाळी ११ ते दुपारी१ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र अनेक शाळांमध्ये या परीक्षा आपल्या सोयीनुसार घेतल्या जात आहेत. काही शाळांमध्ये या परीक्षा सकाळी ७.३० वाजता तर काही शाळांमध्ये दुपारी १२ वाजता देखील घेतल्या जात आहेत. मात्र याबाबत शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण दिसून येत नाही. शिक्षण विभागाकडून संपर्क अधिकाºयांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीकडून देखील कोणतीही कारवाई याबाबत होताना दिसत नाही.

प्रश्नपत्रिका पोहचविण्यासही आकारले पैसेगेल्या आठ दिवसांपूर्वी संकलित कल चाचणीच्या प्रश्नपत्रिका या जि.प.शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. तर या ठिकाणाहून सर्व तालुक्याचा ठिकाणी प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या. शाळांपर्यंत या प्रश्नपत्रिका पोहचविण्यासाठी मुख्याध्यापकांकडून २०० ते ५०० रुपये घेण्यात आल्याची माहिती काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी दिली. ज्या उद्देशासाठी संकलित चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. तो उद्देश साध्य होताना दिसत नाही.

कोटसंकलित कल चाचणी परीक्षा सुरळीत व पारदर्शक पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शाळांमध्ये भेटी देखील देण्यात आल्या. मात्र जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत फळ्यावर उत्तरे लिहिली जात असल्याचे आढळून आलेले नाही.-बी.जे.पाटील,शिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक विभाग