एरंडोल : तालुक्यातील उमरदे येथे निंबा भिवसन पाटील (वय ४८) यांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास एरंडोल शिवारातील निखिल पेट्रोल पंपा जवळ निंबा भिवसन पाटील (वय ४८) यांना शमीम बी शे.शमशेर यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म जवळ इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, असा परिवार आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन हेड कॉन्स्टेबल सुनिल लोहार तपास करीत आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शॉक लागुन एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 21:10 IST