शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

जळगाव मनपाच्या महासभेत शिवसेना-भाजपा नगरसेवक एकमेकांना भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:59 IST

सफाईचा मक्ता, एलईडी, पाणी टंचाईच्या मुद्यावर गाजली महासभा

जळगाव: दीड महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात-गळे घालून एकत्र प्रचार करणारे भाजपा व शिवसेनेचे नगरसेवक गुरुवारी झालेल्या मनपाच्या महासभेत दलित वस्तीअंतर्गत होणारे काम रद्द केल्याचा मुद्यावरुन एकमेकांना भिडले. तब्बल सहा तास चाललेल्या या महासभेत सफाईचा एकमुस्त सफाईचा ठेका, एलईडी पथदिव्यांचा करार, पाणी टंचाईचा मुद्दा व सतरा मजलीतील १६ वा मजला भाड्याने देण्याचा मुद्यावरुनही भाजपा-सेना नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.तब्बल साडेतीन महिन्यानंतर मनपाची महासभा गुरुवारी झाली. दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा झाली. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ.उदय टेकाळे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. महासभेसमोर मंजुरीसाठी एकूण २० विषय ठेवण्यात आले होते. त्यात १३ शासकीय तर ७ अशासकीय अशा २० विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात १७ विषयांना महासभेने मंजुरी दिली तर तीन विषय महासभेने नामंजूर केले.अकार्यक्षम महापौर, आमदार व सभागृहाचे फलक लावूदलीत वस्ती सुधारचा निधीतून शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात होणारी कामे रद्द केल्यामुळे सेना नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.नगरसेवक प्रशांत नाईक यांनी या प्रकाराचा निषेध म्हणून शुक्रवारी आपल्या प्रभागात अकार्यक्षम महापौर, अकार्यक्षम आमदार व सत्ताधारी यांच्या विरोधातील फलक आपल्या प्रभागात लावण्याचा इशारा दिला.नागरिकांना मुर्ख बनविणे बंद कराअनेक वर्षांपासून राजकीय लाभासाठी गाळेधारकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले जात होते.मात्र, मनपा अधिनियमातील बदलामुळे सत्ताधाºयांनी गाळेधारकांची दिशाभूल केली असल्याचा आरोप नितीन लढ्ढा यांनी केला.आतापर्यंत नागरिकांना मुर्ख बनवत आले असून, आता तरी शुध्दीवर येवून नागरिकांना मुर्ख बनविणे बंद करा असेही लढ्ढा म्हणाले.दरम्यन, शहरात वाढत जाणाºया विद्रुपीकरण व अनधिकृत होर्डींग्सबाबत देखील धोरण ठरविण्याचे गरज असल्याचे मत नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले.एलईडी पथदिव्यांचा निकृष्ट कामाबाबत अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी मांडली लक्षवेधीशहरात एस्को तत्वावर बसविण्यात येत असलेल्या एलईडी पथदिव्यांचे काम घेतलेल्या इएसएल या कंपनीकडून निकृष्ट दर्ज्याचे काम होत असल्याने त्यांचासोबतचा करार रद्द करण्यासाठी भाजपा नगरसेविका अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी महासभेच्या सुरुवातीलाच लक्षवेधी मांडली. या कंपनीसोबत केलेला करार हा मनपाला आर्थिकदृष्ट््या न परवडणारा असून,कंपनीने ३१ मार्च पर्यंत शहरात १५ हजार पथदिवे लावणे गरजेचे असताना आतापर्यंत मुदत संपल्यानंतर देखील केवळ ८ हजार पथदिवे लावले असल्याचे अ‍ॅड.हाडा यांनी सांगितले.कंपनीने ज्या भागात पथदिवे बसविले आहेत. त्यापैकी निम्मे पथदिवे दोन महिन्यातच बंद पडले असून, हे पथदिवे दुरुस्त देखील करण्यात आलेले नसल्याचे अ‍ॅड.हाडा यांनी सांगितले. मनपाने कंपनीला विस्तृत डिपीआर न देताच हा करार केला असून, याबाबत मनपाकडून जाब विचारला. मनपा विद्युत विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील यांनी अ‍ॅड.हाडा यांचे मुद्दे योग्य असल्याचे सांगितले.अ‍ॅड.हाडा यांच्या लक्षवेधीवर चर्चा करताना शिवसेना नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी देखील एलईडीच्या कामामुळे वीज बचत तर होणार नाही उलट मपनाचे नुकसान होणार असल्याने या कंपनीचा करारनामाच रद्द करण्याची सूचना मांडली. त्यावर सत्ताधाºयांसह सर्वच पक्षातील नगरसेवकांनी पाठींबा दिल्यानंतर कंपनीला याबाबत नोटीस देवून करारनामा रद्द करण्याचा ठराव करण्यात आला.गिरीश महाजनांचे नाव आल्याने कैलास सोनवणे व अनंत जोशींमध्ये खडाजंगीएलईडी पथदिव्यांचा मुद्यावर चर्चा सुरु असताता शिवसेना नगरसेवक इबा पटेल यांनी हा करार सत्ताधाºयांचे अपयश असल्याचा आरोप केला. त्यावर भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी विरोध केला. मक्तेदार निर्ढावला असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महापौर, आमदार यांच्यासह गिरीश महाजन यांनादेखील जुमानत नसल्याचे भाजपा सदस्यांनी सांगितले. यावर शिवसेनेचे अनंत जोशी यांनी महाजनांचेही चालत नाही असे बोलू नका असे सांगत राज्य सरकारची दुकानदारी चालत असल्याचा आरोप केला. त्यावर भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी विरोध करत अनंत जोशी यांना रोखले, त्यावर जोशी अधिक आक्रमक झाल्याने सोनवणे व जोशींमध्ये चांगलीच चकमक उडाली. दोन्हीही एकमेकांसमोर आल्यानंतर इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला. तसेच आप्पा माझ्यावर दादागिरी करू नका असेही जोशी यांनी सोनवणे यांना सुनावले. त्यानंतर कुलभूषण पाटील व अनंत जोशी यांच्यातही चांगलीच खडाजंगी झाली.हाच का तुमचा युतीधर्म - शिवसेना नगरसेवकांचा सवालप्रभाग १५ मधील २०१९-२० मधील दलितेत्तर योजनेअंतर्गत कामाला मान्यता मिळण्याबाबत शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांच्याकडून आलेल्या पत्रावर हे काम रद्द करण्याचा ठराव सत्ताधाºयांनी घेतल्यानंतर शिवसेना नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. ५० लाख रुपयांचा निधीतून होणारे काम शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात होत असलानेच हे काम रद्द केले जात असल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी केला. तसेच लोकसभेसाठी गोड बोलून प्रचार करून घेतला, मात्र कामाच्या वेळेला असा दुजाभाव का ? हाच का तुमचा युतीधर्म ? असा सवाल शिवसेना नगरसेवकांनी उपस्थित केला. प्रत्येक गोष्टीत संकुचित वृत्ती ठेवायची हीच सत्ताधाºयांची भूमिका असल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी केला. तसेच या प्रकारामुळे भाजपाची खरी प्रवृत्ती समोर आल्याचेही शिवसेना नगरसेवक अनंत जोशी यांनी सांगितले. एकीकडे १००, २०० कोटी रुपयांच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे ५० लाखाचे काम केवळ सेना नगरसेवकाच्या प्रभागात होत असल्याने विरोध करायचा हीच भाजपाची मूळ प्रवृत्ती असल्याचा आरोप नितीन लढ्ढा यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव