आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर, दि.२६ - केंद्र सरकार व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढविलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात मुक्ताईनगरला शिवसेनेचे अभिनव आंदोलन करण्यात आले. २६ रोजी दुपारी १२ वाजता प्रवर्तन चौकांत सरपणावर स्वयंपाक व ढकलगाडीवर मोटर सायकल ठेऊन तसेच मयताच्या मागे शोक करून आक्रोश करतात त्याप्रकारे आंदोलन करीत महागाईचा निषेध करण्यात आला.शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचे नेतृत्व तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, पं.स.सदस्य भारती भोई, अॅड. मनोहर खैरनार यांनी केले. मोदी सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जीवनावश्यक वस्तूंच्या दारात खूप वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेतर्फे निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
सरपणावर स्वयंपाक व ढकलगाडीवर दुचाकी ठेऊन शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 19:23 IST
मुक्ताईनगर (जि.जळगाव) येथे शिवसेनेतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात मंगळवारी दुपारी १२ वाजता प्रवर्तन चौकात आंदोलन करण्यात आले.
सरपणावर स्वयंपाक व ढकलगाडीवर दुचाकी ठेऊन शिवसेनेचे आंदोलन
ठळक मुद्देमुक्ताईनगरात शिवसेनेचे मोदी सरकारविरोधात आंदोलनसरपणावर स्वयंपाक व ढकलगाडीवर दुचाकी ठेऊन केले आंदोलनमहागाईमुळे नागरिकांचे जीवन झाले कष्टमय