शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा परिषदेत आता नव्या प्रयोगासाठी शिवसेनेचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:36 IST

नाट्यमय घडामोडीची शक्यता

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली़ जिल्ह्यातही शिवसेनेची पॉवर वाढली आहे. या स्थितीत जिल्हा परिषदेत सत्तेत मिळविण्यासाठी सर्व पर्याय सेनेतर्फे आजमावले जात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत नाट्यमय घडामोडी समोर येण्याची शक्यता वाढली आहे़गेल्या वेळी बहुमत नसताना राज्यात सत्ता असल्याने भाजपने सर्व समिकरणे जुळवून काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली व अध्यक्षपद मिळविले़ त्यावेळी राज्यात युती असतानाही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश आले होते़ शिवाय वारंवार युतीचे आश्वासने देऊनही स्थानिक राजकारणात त्याचे पालन न झाल्याने शिवसेना सदस्यांनी नेहमीच यावर नाराजी व्यक्त केली होती़ शिवसेनेवर अभद्र युतीची टीका करणाऱ्या भाजपने याआधीच जिल्हा परिषदेत अशी विरोधाभासी युती केली असल्याने त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका आता शिवसेना सदस्यांकडून उघडपणे होत आहे़सेनेकडे पर्याय कसे ?महाविकास आघाडीत दोन सदस्य अपात्र असल्याने अडचणी वाढल्या आहेत़ या दोन सदस्य अपात्रतेचा मुद्दा यात कळीचा मुद्दा ठरणार आहे़ ते स्पष्ट झाल्यानंतर सर्व गणिते स्पष्ट होतील़भाजपाला केवळ एका जागेची आवश्यकता आहे़ मात्र, अध्यक्षपदासाठी कोणते नाव समोर येते यावरून भाजपच्या गटा-तटाची गणिते अवलंबून राहतील, अध्यक्षपदावरून नाराज गट थेट त्यांच्या सोयीचे अध्यक्ष निवडण्यासाठी सेना-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ शकतात़ यात शिवसेनेला उपाध्यक्षपदाची संधी अधिक असल्याचे समजते त्यात सदस्य नानाभाऊ महाजन व रावसाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत़ त्यामुळे सेनेकडे हा एक पर्याय खुला आहे़ आमदार गुलाबराव पाटील काय भूमिका घेतात? यावर सर्व चित्र अवलंबून राहणार आहे़ मात्र, सत्तेत येण्यासाठी पूर्ण प्रयत्न होतील, असा दावा सेनेकडून होत आहे़अशी वाढली ताकदजिल्ह्यात सेनेने लढविलेल्या सर्व जागांवर त्यांचा विजय झाला आहे़ गेल्यावेळी पेक्षा यंदा जागा वाढल्याने शिवाय पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील यांना मिळणार असल्याचे संकेत असल्याने सेना जिल्ह्यात अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे़ त्यामुळे नेते विकासाच्यादृष्टीने सोयीचे म्हणून या ठिकाणी सत्तेत सहभागी होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतील, असा दावा सेना सदस्यांनी केला आहे़ शिवाय येत्या एक दोन दिवसात यावर बैठकही होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़जि़ प़ तील ‘संजय राऊत’ कोण?शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून सुरूवातीपासून किल्ला लढविला होता़ जिल्हा परिषदेत तशी भूमिका कोण पार पाडणार? अशीही एक चर्चा आता रंगत आहे़अध्यक्षपदासाठी खडसे गट आग्रहीआम्हाला पक्षाकडून अध्यक्षपदाची संधी मिळेल असा विश्वास आहे, मात्र, तसे न झाल्यास समोरच विरोध दर्शवून आमची भूमिका आम्ही ठरवू असा एक सूर खडसे गटाकडून लावला जात आहे़ शिवसेनाही त्या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते़ अडीच वर्षात अधिकारी शिरजोर झाले, कामे थांबली, बोलणारे कुणी नसल्याने हा सर्व खोळंबा झाल्याचा आरोप होत आहे. पुन्हा तसे होता कामा नये यासाठी अध्यक्षपद हे बोलणाºया व्यक्तिस द्यावे, असा प्रयत्न खडसे गटाकडून सुरु आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव