शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे जलसंपदा मंत्र्यांना विचारणार जाब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:05 IST

विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देपाचोरा येथे आजी माजी आमदार आमने-सामनेमतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची उभयतांची ग्वाहीआगळ्या-वेगळ्या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थितीदीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

पाचोरा, जि.जळगाव : विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.एका आगळ्या वेगळया कार्यक्रमात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर आमने सामने आणून जनतेच्या सडेतोड प्रश्नांवर उत्तरे देण्यास भाग पाडणारा कार्यक्रम २७ रोजी रात्री ९ वाजता पाचोरा येथील मानसिंघका मैदानावर पार पडला.येथील प्रागतिक विचार मंच संघटनेतर्फे आयोजित ‘लोकशाही महोत्सव’ ह्या कार्यक्रमात ‘प्रश्न जनतेचे, उत्तर लोकप्रतिनिधींचे’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यमान आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांना एकाच मंचावर आमनेसामने बोलावून जनतेच्या लेखी प्रश्नांवर उत्तरे जाणून घेतली.दीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला घेतले गेले. त्यावर उभयतांनी दिलखुलासपणे सडेतोड उत्तरे देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केला.यावेळी आयोजकांनी स्वीकारलेल्या लेखी प्रश्नांचे वाचन करून गेल्या १० वर्षातील आजी माजी आमदारांची सत्ताधारी आमदार म्हणून असलेली कारकीर्द मतदारसंघात कोणती कामे कशी केली, भविष्यातील व्हिजन काय? काय करायला हवे होते, असे प्रश्न उपस्थित केले. यावर माजी आमदार दिलीप वाघ यांनी १०० कोटींची कामे केल्याचा दावा केला तर विद्यमान आमदार यांनी चार वर्षात ५०० कोटींची कामे केल्याचा दावा केला.यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना उभयतांनी समर्पक उत्तरे दिली. यात शहराचा पाणीप्रश्न, रोजगार निर्मिती, शहरातील महात्मा फुलेंचा पुतळा, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न, राजकीय कारकीर्द यावर सडेतोड उत्तरे दिली.यावेळी विचारलेल्या प्रश्नांत प्रामुख्याने पाचोरा शहरातील पाणी प्रश्न सतत भेडसावत असल्याने त्यावर उभयतांनी वेगवेगळे पर्याय दिले. यात दिलीप वाघ यांनी वाघूर प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर किशोर पाटील यांनी गिरणा प्रकल्पातून पाईपलाईन टाकून पाणी आणण्यावर भर दिला. यावर दोघांचीही मतभिन्नता दिसून आली. म.ज्योतीबा फुले यांचा पुतळा उभारणीचे उभयतांचे प्रयत्न असल्याचे दिसले. रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून लवकरच हजारो बेरोजगारांना काम मिळवून देण्याची योजना हाती घेतल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी सहकार्य करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट करून कोणत्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी आयोजक प्रागतिक विचार मंचचे नंदकुमार सोनार व सुनील शिंदे यांनी प्रश्नांचे वाचन केले. यावेळी आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणPachoraपाचोरा