शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon News: शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांचा पुन्हा एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप; नेमका 'काय' आरोप केलाय वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 13:27 IST

बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंवर धक्कादायक आरोप केलाय.

जळगाव : राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर मात्र तीव्र मतभेद असल्याचं वारंवार समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. या वादात पुन्हा भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. हा आरोप करताना आमदार पाटील यांनी खडसे यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा रोख हा खडसेंकडेच असल्याचे स्पष्ट होत आहे.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंवर धक्कादायक आरोप केलाय. 'बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून स्थानिक प्रमुख कार्यकर्ते बाजूला रहावेत, म्हणून खोटेनाटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या साऱ्या प्रकरणासंदर्भात आपण राज्य शासनाकडे बाजू मांडली आहे. तसेच पोलीस प्रशासनाला पुरावे दिले आहेत. या सार्‍या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

असं द्वेषाचं राजकारण करणं चुकीचंएकनाथ खडसे यांना लक्ष्य करताना आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही सत्तेत आहात म्हणून अशा प्रकारे द्वेषाचे राजकारण करणं चुकीचं आहे. ज्यावेळी सारा प्रकार घडला तेव्हा; ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ते शिवसेनेचे पदाधिकारी कुठे होते? याचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत. त्याचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

भाजपसोबत युतीच्या वृत्ताचे केलं खंडन

आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत युती केल्याच्या चर्चेचे खंडन केले. दोन दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली. ही भेट आकस्मिक होती. त्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. आज होणाऱ्या चार जागांच्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना आणि भाजप आमने-सामने लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीच्या 17 पैकी 17 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील आणि नगराध्यक्ष शिवसेनेचाच विराजमान होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्हाला पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास- ऍड. रोहिणी खडसेदरम्यान, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर केलेल्या आरोपाला खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे. पोलीस तपासात सत्य बाहेर येईलच. पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे प्रत्युत्तर रोहिणी खडसे यांनी दिलंय.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसे