शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली रस्ता वर्षभरात होणार पूर्ण, कामासाठी मंगळवारी मुंबईत होणार बैठक

By आकाश नेवे | Updated: September 17, 2022 21:00 IST

एनएच पीडब्लूडीचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित

जळगाव : जळगाव शहर ते चाळीसगाव या महामार्गाच्या कामात चार कि.मी.चा रस्ता सोडण्यात आला होता. मात्र, त्यासाठी आता पुन्हा एकदा हालचालींनी वेग पकडला आहे. काही महिन्यांपूर्वी खासदारांच्या पत्रानुसार जिल्हा प्रशासन आणि एनएच पीडब्ल्यूडी, धुळे विभागाने या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार मंत्रालयाच्या वार्षिक आराखड्यात समावेश केला जाणार आहे. त्यासाठीच मुंबई येथे बैठक होणार असून, या बैठकीला खासदार उन्मेश पाटील आणि एनएच पीडब्ल्यूडी धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता विकास महाले उपस्थित राहणार आहेत.

जळगाव शहर ते नांदगाव या रस्त्याचे दुपदरीकरण करण्याचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला. त्यात जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते चाळीसगाव या प्रकल्पाचे काम २०१७ मध्ये सुरू करण्यात आले. त्यावेळी इच्छादेवी ते देवकर महाविद्यालय हा रस्ताच या प्रकल्पातून वगळण्यात आला होता. त्यावेळी बिल्डिंग लाइनचा नियम अस्तित्वात होता. २०१९ च्या परिपत्रकानुसार हा नियम बदलण्यात आला. त्यानंतर काही काळाने हा महामार्ग पुन्हा तयार करण्याच्या कामांना सुरुवात झाली. कोविडनंतर जनतेतून या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली. चाळीसगाव, पाचोरा आणि पुढील भागाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती. त्यासोबतच गणेश विसर्जन मार्गही आहे.

रस्ता कुणाच्या मालकीचा?इच्छादेवी चौक ते देवकर अभियांत्रिकी हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे. त्यावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होता. आधी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित झाला. नंतर प्राधिकरणाने हा रस्ता महापालिकेकडे वर्ग केला होता. त्यामुळे या रस्त्याचा मुख्य महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या निविदेत समावेश केला गेला नव्हता. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता महापालिकेकडेच असल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी महापालिकेने या रस्त्यावर दुभाजक कसे उभारले, असा सवालही केला होता.

कुणासाठी वगळला होता रस्ता२०१७ मध्ये महामार्गावर बिल्डिंग लाइनचा नियम होता. त्यामुळे काही जणांच्या मालमत्तांवर अडचणीत येऊ शकल्या असत्या. मात्र, हे टाळण्यासाठी रस्ता दुपदरी झालाच नव्हता. मात्र, २०१९ मध्ये हा बिल्डिंग लाइनचा नियमच बदलला गेला. आता रस्ता दुपदरी झाला तरी कुणाला अडचण होणार नाही. 

या रस्त्याबाबत मुख्य अभियंता, मुंबई यांच्याकडे मंगळवारी सकाळी बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत वार्षिक आराखड्यात समावेश केला जाणार आहे. साधारणत: वर्षभरात हा रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन आहे.उन्मेश पाटील, खासदार

टॅग्स :Jalgaonजळगाव