म. रा. पत्रकार संघाचे निवेदन
जळगाव : शिर्डी संस्थान प्रशासनाने दोन पत्रकांरावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे निषेध नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा खोटा असून याबाबत राज्यस्तरावर आंदोलनही करण्यात येणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी कळविले आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकार संघाकडून सोमवारी निवेदन देण्यात आले.
डॉ. पठाण यांच्याकडे पदभार
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांची प्रकृती खराब असल्याने प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. इमरान पठाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून डॉ. सोनार हे रुग्णालयात दाखल आहेत.
योगेश पाटील यांची निवड
जळगाव : अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या जळगाव महानगर उपाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची नुकतीच बैठक झाली. त्यात त्यांना केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष नंदू पाटील, महानगर कार्याध्यक्ष किशोर पाटील उपस्थित होते.