शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

पंढरपूरच्या विठोबाला शेंदुर्णीचा चंदन लेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 16:20 IST

चंदन पेस्ट मशीनद्वारे तयार होतो प्रती दिन तीन किलो चंदनाचा लेप; कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर संस्थानकडून आॅर्डर

ठळक मुद्देम्हैसूरच्या चंदनासाठी शेंदुर्णीचे मशीनमहालक्ष्मी संस्थानकडून विचारणानवनिर्मितीच्या ध्यासातून संशोधनाकडे

विलास बारी ।आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२९ : महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाची मूर्र्ती शीतलीकरणासाठी शेंदुर्णी (ता. जामनेर, जि.जळगाव) येथील सुभाष जगताप यांनी तयार केलेल्या चंदन पेस्ट मशिनचा वापर केला जात आहे. यासाठी त्यांनी खास चंदन पेस्ट यंत्र तयार केले आहे. याद्वारे प्रती दिन अडीच ते तीन किलो चंदनाचा लेप तयार करून मूर्ती शीतलीकरणाची प्रक्रिया केली जात आहे. पंढरपूरनंतर आता कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर संस्थाननेदेखील या चंदन पेस्ट मशिनची आॅर्डर बुक केली आहे.शेंदुर्णी हे महानुभाव पंथीय बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दत्त स्वामी यांचे ठाणे आहे. उटी उपचार करण्यासाठी चंदनाची लाकडे हाताने घासून तयार झालेला लेप दत्त स्वामी यांच्या ठाण्याजवळ लावला जातो. चंदनाचा लेप तयार करण्यासाठी मोठीच कसरत करावी लागत असल्याने येथील विश्वस्तांनी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधत एखादी यंत्र तयार करता येईल का? अशी विचारणा केली. जगताप यांनी अवघ्या काही दिवसात हे यंत्र तयार करून दिले.दहा कर्मचाºयांचे काम अडीच तासातवैशाख वणव्याची दाहकता कमी करण्यासाठी विठुरायाला परंपरागत चंदन उटी पूजेलाही सुरुवात होते. त्यासाठी रोज दहा कर्मचाºयांना तासन्तास चंदन उगाळावं लागत होतं. देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी ७५० ग्रॅम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येतं. यापूर्वी हे चंदन उजळण्यासाठी दहा कर्मचारी सलग चार महिने हे काम करत असत.म्हैसूरच्या चंदनासाठी शेंदुर्णीचे मशीनशीतल चंदनाचा लेप विठुरायाच्या संपूर्ण अंगाला लावण्यात येतो. लेपनासाठी खास म्हैसूरहून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदन उटीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोशाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसºया दिवशी काढण्यात येते.महालक्ष्मी संस्थानकडून विचारणाजगताप यांनी चंदन पेस्टचे यंत्र तयार केल्यानंतर ते कशा पद्धतीने काम करते याचा व्हिडिओ तयार करून यू ट्यूबवर अपलोड केला. या यंत्राबाबत माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूर येथील महालक्ष्मी संस्थानकडून या यंत्राबाबत विचारणा झाली. यासोबतच अहमदाबाद येथील नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन तसेच नागपूर व फलटण येथून आॅर्डर नोंदविण्यात आली आहे.

नवनिर्मितीच्या ध्यासातून संशोधनाकडेशेंदुर्णी येथील सुभाष वसंतराव जगताप हे अवघे सातवी उत्तीर्ण आहेत. त्यांनी सायकलवरील कोळपणी यंत्र आणि फवारणी पंप तयार केले. याबद्दल त्यांचा तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्ली येथे सन्मान झाला होता. या पुरस्कारातून प्रेरणा घेत त्यांचे पुत्र सचिन जगताप यांनी भिलावा फोडण्याचे मशीन तयार केले. या संशोधनाला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता.काही दिवसांपूर्वी सिनेअभिनेता अक्षय कुमार याने जगताप यांच्या लघुउद्योगाच्या विस्तारासाठी पाच लाखांची मदत देऊन सन्मानित केले होते. सचिन यांचे लहान बंधू स्वप्नील यांनी आॅटोमोबाइल इंजिनिअरिंग करीत वडील व भाऊ यांच्या नवनिर्मितीच्या प्रयत्नांना हातभार लावला आहे.

आपण केवळ १२ वी पास आहोत. मात्र नवनिर्मितीचा ध्यास असल्याने चंदन पेस्टसारखी कमी श्रमाच्या आणि कमी किमतीच्या वेगवेगळ्या मशीन तयार करीत आहोत. आगामी काळात काजू कटिंग मशीन तयार करण्याचा मानस आहे.-सचिन सुभाष जगताप, शेंदुर्णी

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरJalgaonजळगावJamnerजामनेर