शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

शेंदुर्णीला महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:27 IST

पदाधिकारी नसल्याने महिलांचा संताप

शेंदुर्णी, ता. जामनेर : येथील शनि मंदिर मागील खळवाडी या नवीन वसाहत परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतवर महिलांनी हंडा मोर्चा काढून पाण्याची मागणी केली. दुपारी १२ वाजेच्या नगरपंचायतवर मोर्चा आल्यानंतर तेथे कोणीही पदाधिकारी नसल्याने महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला.येथील नदीकाठी असलेल्या शनि मंदिराच्या पाठीमागील नवीन वसाहतीस अनेक वर्षे झाली तरी या भागात पाणीपुरवठ्याची वाहिनीच पोहोचलेली नाही. या भागात अद्यापही हातपंपावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून हातपंप बंद असल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.वारंवार मागणी करूनही पाण्याचा प्रश्न सोडविला जात नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी थेट नगरपंचायवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्यासह सुशिलाबाई धनगर, कविताबाई धनगर, शांताबाई धनगर, रत्नाबाई धनगर, ज्योतीबाई धनगर, कौशल्याबाई धनगर, प्रमिला धनगर, अलका धनगर, शोभा धनगर, कोकिळा धनगर आदी महिला हंडा मोर्चात सहभागी झाल्या होत्या.आठ ते दहा महिन्यांपूर्वी पाण्यासाठी याच भागातील महिलांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन दिले होते, असे महिलांनी ‘लोकमत’ बोलताना सांगितले. मात्र त्यादृष्टीने कोणतेही पाऊल उचले गेले नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव