शहादा : शहरातील गरीब-नवाज कॉलनीतील मदरशात शिक्षण घेणा:या बालकाचे शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात लोकांनी अपहरण केले होते. मात्र बालकाने सावधगिरी बाळगत अक्कलकुव्याजवळ त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली.‘दो किडनी की व्यवस्था हो गई’ असे गुजराती भाषेत बोलत होता. ते ऐकून बालक भेदरला होता. अक्कलकुवाच्यापुढे गतिरोधकामुळे गाडीचा वेग कमी झाल्याने या बालकाने सावधगिरी बाळगत चालत्या कारमधून पलायन केले. एका दुकानावर जाऊन त्याने वडिलांना भ्रमणध्वनी केला. बालकाचे वडील इद्रीस मन्सुरी यांचे जावई अक्कलकुवा येथे राहतात. त्यांना ही घटना कळविली. त्यानंतर ते दोघे अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गेले. रविवारी सायंकाळी उशिरार्पयत शहादा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस सूत्रांनुसार, मेलन-खेतिया (मध्य प्रदेश) येथील बालक शहादा येथील गरीब-नवाज कॉलनीत असलेल्या मदरसा येथे शिक्षण घेत आहे. शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रेखा गॅस गोडाऊनजवळील एका किराणा दुकानात आंघोळीचा साबण घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी दोन जणांनी त्याच्याजवळ येऊन गुजराती भाषेत बसस्थानकाचा पत्ता विचारत असतानाच तोंड व डोळे झाकून त्याला कारमध्ये कोंबले व गुजरातकडे मार्गस्थ झाले. वाहनात चार जण होते. त्यापैकी दोन जण मद्याच्या नशेत होते. एकजण भ्रमणध्वनीवर दरम्यान, शहादा शहरात दीड महिन्यात अपहरणाची ही दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेतील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. त्या घटनेचा पूर्ण तपास लागला नाही तोच शनिवारी अपहरणाची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीची वातावरण आहे.