शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१२० कोटींच्या केटामाईन तस्करी प्रकरणात सात जण दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:54 IST

पाच जण निर्दोेष, २२ रोजी अंतिम निकाल

जळगाव : तब्बल १२० कोटी रुपये किंमतीच्या केटामाईन (अंमली पदार्थ) तस्करी प्रकरणी सात आरोपींना दोषी ठरविण्यात आले तर ५ जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. या सात आरोपींना २२ रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. बुधवारी न्या.एस.जी.ठुबे यांनी या आरोपींना दोषी धरले.१३ डिसेंबर २०१३ रोजी रात्री जळगावनजीक उमाळा शिवारात ही घटना घडली होती. गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी कारागृहातच आहेत.दोषी धरण्यात आलेल्या आरोपींमध्ये वरुण कुमार तिवारी (४२, रा.विक्रोळी, मुंबई), जी. श्रीनिवास राव (५२, पवई, मुंबई), नितीन चिंचोले (५६, जळगाव), विकास पुरी (४८, पवई, मुंबई), खेमा मधुकर झोपे (४७, अंबरनाथ, जि.ठाणे), रजनीश ठाकूर (५०, सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) व एस.एम.सेन्थीलकुमार ( ४०,.चेन्नई) या सात जणांचा समावेश आहे.गौरी प्रसाद पाल (५६, विक्रोळी, मुंबई), नित्यानंद थेवर (३२, .धारावी, मुंबई), कांतीलाल उत्तम सोनवणे (३४, रा.उमाळा, जळगाव), विशाल सोमनाथ पुरी ( ४५, जनकनगरी, नवी दिल्ली) व विलास रामचंद्र चिंचोले (६८, जळगाव) या पाच जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) पथकाने १३ डिसेंबर २०१३ रोजी रात्री जळगावनजीक उमाळा शिवारात आयोसिंथेटीक या कंपनीत छापा मारला होता. यावेळी एका वाहनात ४५ किलोग्रॅम वजनाच्या केटामाईनच्या प्रत्येकी चार गोण्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर धुळे येथे एका हॉटेलमध्ये छापा मारुन वरुण तिवारी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चारचाकीतही केटामाईन मिळून आले होते. रात्रभरातून १ हजार १७५ किलो केटामाईन या पथकाने जप्त केले. या गुन्ह्यात १२ संशयितांना अटक करण्यात आली होती. ३ सप्टेबर २०१६ रोजी न्यायालयात दोषारोप दाखल करण्याात आले. डीआरआयतर्फे अ‍ॅड.अतुल सरपांडे व सरकारतर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. संभाजी पाटील यांनी खटल्याचे काम पाहिले. या खटल्यात तब्बल ४४ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव