धुळे : जिल्हा परिषदेत 1988 ते 1989 मध्ये झालेल्या 51 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी तत्कालिन कनिष्ठ सहायक कम रोखपाल भास्कर शंकर वाघ याच्यासह सात जणांना जिल्हा न्यायालयाने बुधवारी शिक्षा सुनावली़ या अपहारकांडात 14 आरोपींचा सहभाग होता़ त्यापैकी 5 आरोपी मयत झाले असून दोघांची निदरेष मुक्तता करण्यात आली़ जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी असलेल्या 51 लाख रुपयांच्या निधीचा बनावट दहा धनादेशाद्वारे अपहार करण्यात आला होता़ या अपहारात सहभागी असणा:या 17 आरोपींविरुद्ध 29 जून 2007 ला आरोप निश्चित झाले होत़े आरोपींमध्ये भास्कर वाघ याला 10 वर्ष शिक्षा व 1 लाख दंड, मेहबुबखॉ मेहताबखॉ पठाण (शिपाई) याला 3 वर्ष शिक्षा 65 हजार दंड, जगन्नाथ बापूराव पवार (वरिष्ठ लिपिक, डीडीसीसी बँक) याला 3 वर्ष शिक्षा 65 हजार दंड, शिवकुमार रामदेव जोशी (सांख्यिकी सहायक) याला 3 वर्ष शिक्षा, 80 हजार दंड, सखाराम रावजी वसावे (सहायक लेखाधिकारी) याला 5 वर्ष शिक्षा 85 हजार दंड, भास्कर नथ्थू पाटील (मुख्य लेखाधिकारी) याला 3 वर्ष शिक्षा 65 हजार दंड व शैलेजा रमेश पाध्ये हिला 3 वर्ष शिक्षा 60 हजार दंड सुनावला आह़े यात खटल्यात भगवान वामन पाटील (रोखपाल) व बसप्पा मल्य हिरनआळे (जिल्हा नियोजन अधिकारी) यांची निदरेष मुक्तता झाली़ या खटल्यात भिकन ज्योतीराम बोरसे, डिगंबर विठ्ठल बोरवले, मनोहर हिरामण चौधरी, नारायण बापू पाडवी व वसंत तुकाराम पवार यांच्यावर आरोप होत़े ते मयत झाले आहेत़ हा निकाल न्यायाधीश आऱ आऱ कदम यांनी दिला़ सरकारतर्फे अॅड़ संभाजीराव देवकर यांनी काम पाहिल़े 14 साक्षीदार तपासण्यात आल़े गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक घन:श्याम पाटील यांनी केला़
जि़प़ अपहारप्रकरणी भास्कर वाघसह सात जणांना शिक्षा
By admin | Updated: December 31, 2015 01:00 IST