शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सात ते आठ लाखांचा कडबा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 15:42 IST

दादरच्या कडब्याची गंजी पेटली

वरखेडी ता.पाचोरा :- लोहारी येथील बैलांचे व्यापारी हाजी सैद अ.करीम यांच्या कडब्याच्या गंजीला गुरुवार रोजी दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागून सात ते आठ लाख रुपयांचा दादरचा कडबा जळून खाक झाला.पाचोरा वरखेडी रोडवर असलेल्या लोहारी गावी हमरस्त्याला लागून हाजी सैद अ.करीम यांचे निवासस्थान आहे. निवासस्थानाच्या समोरच हमरस्ता ओलांडून त्यांचे गुरांचे व चाऱ्याचे शेड आहे.शेडच्या बाहेर असलेल्या कडब्याच्या गंजीतुन दुपारी धूर निघत असलेला काही लोकांना दिसून आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता आगीने तोपर्यंत उग्ररूप धारण केले व बघता बघता संपूर्ण चारा जळून खाक झाला. हाजी सैद हे बैलांचे व्यापारी असून त्यांच्याकडे आठ ते दहा म्हैशी तसेच ५० ते ६० बैल नेहमी असतात.येत्या उन्हाळ्यात चारा टंचाईला तोंड देण्यासाठी त्यांनी नुकताच साडेसहा हजार रुपये शेकड्याच्या दराने दादरचा कडबा जवळजवळ बारा हजार पेंडी विकत घेतला होता, असे त्यांनी सांगितले. घटनास्थळी पाचोरा नगरपरिषदेचा अग्नीबंब दिड वाजेच्या सुमारास दाखल झाला. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. त्यानंतर भडगाव येथिल अग्निशमन बंब देखील या ठिकाणी दाखल झाला. तसेच भोकरी येथील अकिल अहमद काकर यांनी आपले खासगी पाण्याचे टँकर तसेच सुभाष वामन पाटील लोहारी यांनी देखील आपले मालकीचे पाण्याच्या टँकरने आग विझवण्याकामी प्रयत्न केले. हाजी सैद है यावेळी वरखेडी येथील गुरांच्या बाजारात बैल विक्रीसाठी गेलेले होते.धर्म भेद विसरुन अनेक धावले मदतीलाकोणावरही संकट आले तरी संकटाच्यावेळी जातीपातीचा विचार न करता सर्व एक दिलाने धावपळ करताना याठिकाणी दिसून आले. हिंदु तथा मुस्लिम बांधवांनी पेटता चारा वाचविण्याचा शर्थीचे प्रयत्न करून मोठ्या मुश्किलीने शंभर-सव्वाशे पेंडी चारा वाचविला. घटनास्थळी वरखेडी सजाचे तलाठी जे.एस.चिंचोले यांनी पंचनामा केला. तीव्र उन्हामुळे या कडब्याच्या गंजी ने पेट घेतला असावा असा कयास व्यक्त करण्यात येत होता.

टॅग्स :fireआग