शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसाच्या साक्षीने सप्तसुरांनी उजळली दिवाळी पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:15 IST

हजारो दिव्यांसोबत स्वरचैतन्याचा उत्सव

जळगाव : मिणमिणत्या पणत्या प्रज्ज्वालीत करता करता पहाटेच उजेडाची अनुभूती, उगवता नारायण जस जसा वर सरकत प्रकाश किरणांचा वर्षाव करत सारे तेज भूमंडळी उधळतो, समस्त मानवास आनंद देत जातो तेच तेज, तेच चैतन्य तोच आनंद व सोबतीला रिमझिम पावसाच्या सरींच्या साक्षीने सप्तसुरांची उधळण होत यंदाची ‘दिवाळी पहाट’ उजाडली. निमित्त होते लोकमत सखी मंच आणि प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित दिवाळी पहाट या मराठी, हिंदी भावगीते, सुगम संगीताच्या सुरेल मैफिलीचे. ‘सूर निरासगर हो.....’ ने सुरुवात होऊन कार्यक्रमाला मिळत गेलेली उंची अगदी शेवटच्या ‘देवा तुझ्या दारी आलो....’पर्यंत गायक कलावंतांनी टिकवून ठेवत रसिकांची दाद मिळविली.दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा यासाठी लोकमत सखी मंच आणि प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने रविवारी ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन काव्यरत्नावली चौकात करण्यात आले होते. या वेळी हजारो पणत्या प्रज्वालित करण्यात आल्या.आमदार सुरेश भोळे, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, डॉ. प्राची महाजन, डॉ. प्रकाश महाजन यांच्याहस्ते ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्ज्वालन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटलचे डॉ. गौरव महाजन यांचे स्वागत करण्यात आले. एस.के. आॅईलमिलचे यासाठी सहकार्य मिळाले.दीपोत्सवासह आर.टी.एंटरटेंटमेंट, अमरावती यांच्या चमूकडून मराठी-हिंदीतील दिवाळी व भक्तीगीतांची ही सुमधूर मैफल गायक कलावंत राहुल तायडे, रोशनी दर्जी, प्राची माडीवाले यांनी बहारदार गीते सादर करून रसिकांची दाद मिळविली. यात सुर निरागस हो, ओम नम: शिवाय, झिनी झिनी वाजे बिन, मन मंदिरा, अधीर मन झाले, केव्हा तरी पहाटे, दिल कि तपीश, आली माझ्या घरी ही दिवाळी, शुक्रतारा, बाजेरे मुरलीया बाजे, आज जाने कि जिद ना करो (मेलडी गझल), हसता हुवा नूरानी चेहरा, एक राधा एक मीरा , मोहें रंग दो लाल, माझे माहेर पंढरी, पिया तोसे नैना, अश्विनी येना, लाल मेरी, देवा तुझ्या दारी आलो... अशा एकाहून एक हिंदी, मराठी गीत, भक्तीगीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. यात देवा तुझ्या दारी आलो या गणरायाच्या आराधनेने कार्यक्रमाची सांगता झाली. मनीष आत्राम (ढोलक), शीतल मांडवगणे (तबला), सतीश रुद्रकाल (आॅक्टोपॅड), प्रवीण जोंधलेकर (आॅर्गन) यांनी साथसंगत केली.सूर्यनारायणाच्या साक्षीने सुरांची बरसातकाव्यरत्नावली चौकात पहाटे रसिकांना सहपरिवार फक्त एक पणती घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक जण सहकुटुंब एक एक पणती घेऊन ती प्रज्ज्वालीत करत कार्यक्रमात सहभागी होत होते. हळूहळू रसिकांच्या उपस्थितीने हा परिसर पूर्ण भरून गेला आणि संगीताची ही मैफल रंगत गेली. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव