शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:19 IST

राजकीय आखाड्यात ‘शिक्षण’

रवींद्र मोराणकर जळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी रावेर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर चारच उमेदवार पदवीधारक व पदव्युत्तर आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्ये तर एकही पदवीधारक नाही, सर्व दहावी-बारावीच्या आतच आहेत.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २५ टक्के उमेदवार हे पदवीधर व पदव्युत्तर आहेत. एका उमेदवाराकडे डी.लीट. पदवी आहे. दोघा उमेदवारांनी शिक्षणाच्या कॉलमात निरंक म्हटले आहे. याचा अर्थ ते अशिक्षित आहेत.वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवारएकूण डझनभर उमेदवारांमध्ये वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवार आहेत. ते माजी खासदार तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.उल्हास पाटील आपले भवितव्य पुन्हा आजमावत आहेत. यानंतर विद्यमान खासदार रक्षा खडसे बी.एस्सी. (कॉम्प्यूटर) याही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीसमाजातील उच्चशिक्षित घटकांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवार अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. यातील एक उमेदवार दहावी पास, एक दहावी नापास, एक अशिक्षित आहे.शिक्षण पाहूनच मतदानभारताच्या सर्वाेच्च सभागृहात आपण आपला खासदार प्रतिनिधी म्हणून पाठवित असतो. त्याला किमान प्रश्न उपस्थित करता आले पाहिजे. यासाठी तो उच्च शिक्षित असावा. म्हणून उमेदवार निवडून देताना त्याचे शिक्षण बघून मी मतदान करतो. उमेदवाराच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य देतो.-अक्षय संजय पाटीलशिक्षित असावालोकसभा निवडणूक लढविणारा उच्चशिक्षित असावा ही अपेक्षा आहेच. कारण त्याच्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग तो मतदारसंघाच्या विकासासाठी करू शकतो. याचबरोबर उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असावा व तो गुन्हेगारी पार्श्वभुमीचा नसावा. मतदारांच्या अडीअडचणींची जाण असणारा असावा.-डॉ.चंद्रशेखर पाटीलतरुणाईने विचार करावाउमेदवाराच्या शिक्षण पात्रतेसह त्याचे काम करण्याची क्षमता तपासूनच मतदान करणे जागरुक मतदाराचे कर्तव्य आहे. मात्र अलीकडे याबाबत दुर्लक्ष केले जाते. तरुणाईने याचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षणासह विकासाभिमुख दृष्टिकोन गरजेचा आहे, असे मला सूचवावेसे वाटते.-संजय सापधरे

टॅग्स :Jalgaonजळगाव