शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भोरगाव लेवा पंचायतचे ४ फेब्रुवारी रोजी अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:03 IST

समाजाने सहभागी व्हावे, कुटुंब नायक रमेश पाटील यांचे आवाहन

ठळक मुद्देलेवा पाटीदार समाजातील समस्यांवर होणार चिंतन व मंथन४ फेब्रुवारी रोजी पाडळसे (ता.यावल) येथे होणार महाअधिवेशनसमाजबांधवांनी पुढाकार घेण्याचे केले आवाहन

आॅनलाईन लोकमतयावल, दि.१६ : तालुक्यातील पाडळसे येथे ४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या जागतिक भोरगाव लेवा पंचायतच्या एक दिवशीय अधिवेशनात समाजातील समस्यांचे चिंतन व मंथन होणार आहे. त्यामुळे सर्व लेवा समाज बांधवांनी अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी शहरातील बाजार समितीच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या बैठकीत केले आहे.४ फेब्रुवारी रोजी पाडळसे (ता.यावल) येथे भोरगाव लेवा पंचायतचे महा अधिवेशन होत आहे. तेव्हा या अधिवेशनाच्या पूर्व तयारीसाठी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात लेवा समाज बांधवांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीला प्रमुख उपस्थितीत आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार रमेश चौधरी, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहेते, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जि.प.चे माजी सदस्य हर्षल पाटील, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, बाजार समितीचे संचालक नारायण चौधरी, राकेश फेगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना कुटुंब नायक रमेश पाटील यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे निमत्रंक संपूर्ण यावल तालुका आहे. तालुक्यातील समाज बांधवांवर मोठी जबाबदारी आहे. तेव्हा प्रत्येकाने या करीता पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रशांत चौधरी यांनी मानले.