शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सेवा हाच परमधर्म...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 13:04 IST

तीर्थंकर भगवान महावीर ने बारा प्रकारचे तप सांगितले आहेत. उपवास, रसत्याग, इंद्रीय संयम अशा प्रकारच्या तपापेक्षाही ध्यान, स्वाध्याय याला ...

तीर्थंकर भगवान महावीर ने बारा प्रकारचे तप सांगितले आहेत. उपवास, रसत्याग, इंद्रीय संयम अशा प्रकारच्या तपापेक्षाही ध्यान, स्वाध्याय याला श्रेष्ठ म्हटले आहे. भगवान म्हणतात की जो मुनी बेशुध्द, रुग्ण, वृध्द, तपस्वी यांची सेवा सहजभावाने करेल, तो माझी सेवा करतोय, असे मानले जाईल. सेवा करणाऱ्याला दोन गोष्टींवर ध्यान दिले पाहिजे. सेवा करण्याची भावना असेल तर अहंकारमुक्त सेवा द्यावी लागेल. सेवा करताना मोठी छोटी असा भेद करून चालणार नाही. तुमच्यासमोर जो अपेक्षा घेऊन उभा आहे, त्याला काय हवंय, कसं हवंय हे पाहून त्याला जर आपण काही देऊ शकत असाल तर द्यावे. पण प्रतिदानाची भावना न ठेवता दान करावे. सेवा करताना लहान मोठा, गरीब श्रीमंत, काळा गोरा असा भेद करून चालत नाही. महात्मा गांधी स्वत: रोग्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असत.सेवेची सीमा केवळ शरिरापुरतीच मर्यादीत नाही. शारीरिक सेवेपेक्षाही मोठी आहे ती मानसिक सेवा. समोरचा कोणत्याही जटील प्रकृतीचा असू दे, सेवा करणाºयाने त्याला आपल्या सेवेसाठी अनुकुल बनवले पाहिजे. घृणा, व्देष विरहीत समतेचा भाव मनात ठेवून सेवा करणारा हाच खरा सेवक आहे. सेवा करण्यामुहे आपल्या स्वत:चे रसायनही बदलून जातात. सेवा ही नवी ऊर्जा आणि नवा प्रकाश देते. म्हणूनच म्हणतात सेवाधर्म हा खूप खोल आहे आणि योगींसाठी तो तर अगम्य आहे, असे म्हणावे लागेल.-साध्वी डॉ. योगक्षेमप्रभाजी 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव